राहुल कदम याची अध्यक्षपदी  तर सेक्रेटरी म्हणून विकास मोरे याची निवड.

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य पातळीवरील दोन दिवशीय शिबीर औरंगाबादेतील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात संपन्न झाले. शिबिराच्या समारोप प्रसंगी राज्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्याध्यक्ष म्हणून राहूल कदम यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी विकास मोरे यांची निवड करण्यात आली.

दोन दिवसांच्या शिबिरात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची भूमिका, सत्यशोधक विद्यार्थी संघटना-संघटन बांधणी, सांस्कृतिक लढे, समकालीन शिक्षण आव्हाने, पर्याय, जातिअंताचे तत्वज्ञान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा लढा, राष्ट्रीय शिक्षण धोरण, प्राथमिक आणि उच्च शिक्षणासंदर्भात चिकित्सा, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शेतीप्रश्न, बदलते आरक्षण धोरण, समकालीन राजकारण, फॅसीझमचे आव्हान अशा महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. उमेश बगाडे, डॉ. प्रकाश सिरसाठ, श्रीकांत काळोखे, किशोर जाधव, प्रा. संतोष सुरडकर, संतोष पेडणेकर, दीपक कसाळे, स्वाती आदोडे, मंजुश्री लांडगे, सुवर्णमाला मस्के, सतीष बनसोडे यांनी मांडणी करीत प्रबोधन केले. या शिबिरात नवीन शिक्षण धोरणाच्या विरोधात राज्यभर स्वाक्षरी मोहीम घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा आणि मुंबईतील आंतररष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाला राजर्षि शाहू महाराज यांचे नाव देण्यासाठी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिबिराच्या समोरापसत्रात मावळते राज्याध्यक्ष अमोल खरात यांनी राज्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी राज्याध्यक्ष म्हणून राहूल कदम यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत राज्य सचिव म्हणून विकास मोरे, राज्य उपाध्यक्ष निशिकांत कांबळे, सह सचिव श्रध्दा खरात, राज्य संघटक तुषार सूर्यवंशी, राज्य संघटक, सिद्धांत बागूल, राज्य संघटक, मोहन सोनसळे, कोषाध्यक्ष सुरेश सानप, राज्य प्रवक्ता आत्राम बुद्धेवाड, राज्यकार्यकारनी सदस्य म्हणून पंकज परतवाघ (नाशिक), सुजय जाधव ( कोकण), सतिष खैरनार (धुळे), निलिमा जाधव (कोकण), अविनाश तायडे (जळगाव), प्रीती होळकर (नांदेड) यांची निवड करण्यात आली. शिबिरासाठी राज्यभरातून जवळपास १०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निशिकांत कांबळे, अविनाश सिताफुले दीपक पगारे, अंकूश राठोड, सुरेश सानप, श्रद्धा खरात, सविता मोरे, स्वाती चेके, गणेश बिरुटे, स्वाती आदोडे, जयश पठाडे, सचिन खंदारे, पवन मस्के, शिवप्रसाद कुकडेकर, राम सहाने, अमोल खरात, सुयश नेत्रागावकर, सोनाली मस्के यांनी परिश्रम घेतले.