कवयित्री प्रा. सुचिता कदम – गायकवाड यांचा दुसरा कवितासंग्रह ‘मानली ना हार मी’ प्रकाशित झाला आहे. हा कवितासंग्रह सुगावा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे.

‘साक्षीदार’ या पहिल्या कवितासंग्रहानंतर बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कवितासंग्रह दाखल झाला आहे. माणसाचे नितळ, निरूपाधिक आणि कोणत्याही चौकटीत न मावणारे मुक्त माणूसपण प्रस्थापित व्हावे असे या संग्रहातील कवितांना उत्कटपणे वाटते. म्हणून विधायक विद्रोह करीत मनाच्या सौंदर्याची आस सांगणारी कविता कवयित्री मांडतात. विद्रोह, श्रद्धा-  अंधश्रद्धा, स्त्री जाणिवा , निसर्ग, प्रेम अशा विविध भावना व्यक्त करताना ही कविता अखेर माणूसपणाला साद घालते.

या कवितांग्रहात एकूण ३७ कवितांचा समावेश आहे. या कवितासंग्रहाला कवी अजय कांडर यांची प्रस्तावना आहे. कवी यशवंत मनोहर यांनी पाठराखणपर विवेचन करत कवितासंग्रहाविषयी नेमकेपणाने भाष्य केले आहे.

पुस्तकाची पृष्ठे ६२ असून मूळ किंमत ८० रुपये आहे.