1950 नंतर स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत देशातील आदिवासींना ‘अनुसूचित जमाती’ असे नामांकन वापरल्यानंतर त्यांची ही शासकीय ओळखच नव्या राष्ट—-राज्याच्या चाैकटीत स्थापित करण्यात आली आहे.हिंदीभाषेत आदिवासींसाठी ‘जनजाति’ असा अभिजनीय शब्द वापरण्याचा प्रघात पाडला गेला आहे. जातीव्यवस्थाक जाणीवपरिघातून ही संज्ञा याेजण्यात आली आहे,हे स्पष्टच हाेते. जे जातीव्यवस्थाक नाहीत, असे विभिन्न जमातींचे जनविभाग म्हणजेच जनजाती असा याचा एपिस्टेमाॅलाॅजिकल संदर्भार्थ आहे. सत्तरीच्या दशकात आदिवासींच्या मुक्तीदायी चळवळीला चालना मिळाल्यानंतर आदिवासी ही ओळख नव्याने रचली जात हाेती. जात, वर्ग, वंश, लिंगभेद यासारख्या वास्तविक समाजशास्त्रीय काेटींच्या संयुक्तिक परिदृष्टीतून आदिवासी ही ओळख व्याख्यांकित हाेऊ लागली हाेती. उत्तरकाळात संविधानात वापरलेल्या अनुसूचित जमाती या संज्ञेऐवजी आदिवासी हा अस्मितादर्शक शब्दाला मान्यता देण्यात येवून घटनात्मक संरक्षण मिळावे अशी वांछा आदिवासीचळवळीत प्रबल हाेत गेली. हिंदुत्त्ववादी शक्तींव्दारे आदिवासीना ‘वनवासी’ ही मर्यादित ओळख प्रदान करण्याच्या माेहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रचलित शासकीय ओळखीबराेबरच हिंदुत्त्ववाद्यांनी दिलेली ही सांस्कृतिक ओळखही नाकारण्याचा व्यापक राजकीयपट या स्वतंत्र आदिवासी ओळखप्रस्थापनेमागे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. आदिवासी चळवळींनी ‘आदिवासी’ या शब्दाचा वापर सर्वच शासकीय व्यवहार व कामकाजातून अधिकृत केला पाहिजे, ही मागणी मात्र अद्यापही मान्य झालेली नाही.gartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb


ब्रिटिश वसाहतकाळात 1920 च्या जनगणनेत ब्रिटिशांनी जाती, जनजाति, व धर्म आदी श्रेणींची रचना केली.भारतातील आदिवासी जमातींविषयी जाे संशाेधनाभ्यास झाला हाेता, ताेही त्याकाळात मानवशास्त्रीय तसेच सांस्कृतिक अंगापुरताच सीमित हाेता. अशाच तत्कालीन संशाेधनाभ्यासाचा आधार जरी कायदे बनविताना घेतला गेला. तरीदेखील 1935 च्या कायद्यापर्यंत काेणत्या जमातींना आदिवासी म्हणून वर्गीकृत करावयाचे याची स्पष्टता दिसत नाही. 1938 मध्ये छाेटा नागपूर विभागातील आदिवासी नेते जयपालसिंग मुंडा यांनी आदिवासी (आदिबासी)ह्या शब्दाचा उच्चार प्रथमच त्यांच्या आदिवासी महासभेच्या मंचावरुन केला हाेता. तत्पूर्वीच्या 1935 च्या कायद्यात ‘प्राचीन व वन्य जमाती’ असाच शब्द वापरण्यात आल हाेता. ब्रिटिशांनी ज्याप्रकारे आदिवासींना ‘ट्राइब’ ठरविले, त्याची सखाेल चिकित्साही घटनानिर्मितीच्या काळात फारशी काेणी केलेली नव्हती. परंतु हा वासाहतिक प्रभाव पूर्णतः घटनासमितीला टाळता आला नाही. मात्र तिने वापरलेल्या शेड्यूल ट्राइब या शब्दात आदिवासी या संज्ञेच्या आशयाचा मुळात काहीप्रमाणात विचार निश्चितपणे केला हाेता. indigenous याअर्थाने त्यांनी या शब्दाचा विचार केला हाेता. व्यक्तिशः घटनाकार डाॅ. आंबेडकरांनी आदिवासी जनसमुहाला aboriginal असेच त्यांच्या मांडणीत संबाेधले आहे. परंतु जातीव्यवस्थाक चाैकटीत आदिवासी जमातींची दखल कशाप्रकारे घ्यावी याविषयी आदिवासी नेते व घटनासमितीचे इतर निर्माते यांच्यात मतभेद हाेते. घटनानिर्मितीच्या समयी तातडीच्या साेयीसाठी अनुसूचित जमाती हा शब्द वापरण्यात आला आणि ताे घटनेत स्वीकारलेल्या कल्याणकारी राज्याच्या प्रारुपालाही अनुरुप असल्याने त्यानंतरच्या काळात गैरआदिवासी वा शाहू राज्यकर्त्यांना त्याची समीक्षा करावीशी वाटली नाही. त्यामुळे पुढेही ताे शब्द तसाच रुढ हाेत गेला. आदिवासी नेमके काेणत्या जमातींना म्हणावे याचा स्पष्ट उल्लेख घटनेत नसला तरी मानव्यशास्त्र वा तत्सम सामाजिकशास्त्रे यांच्या सापेक्ष निकषावर ‘आदिवासी’ ठरविण्याची भूमिका मात्र घटनेने औपचारिकरित्या स्वीकारलेली दिसते. सामाजिक न्यायाच्या घटनातमक दृष्टीचाैकटीत हे पूरकच हाेते. अनुसूचित जमातींची यादी तयार करताना केंद्रशासनाने जे काही निकष ठरविले हाेते, त्यात (1) प्रिमिटिव्ह आल्याची लक्षणे (Primitive traits ), (2) वेगळी संस्कृती (Distinct culture),(3) भाैगाेलिक अलगता (Geographic Isolation ), (4)संपर्काचा अभाव आणि मागास असणे इ.सारख्या निकषाला अधिक आधारभूत मानले आहे.


मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ जगभरातील सर्व आदिवासी जमातीमधील जे महत्त्वाचे प्रिमिटिव्ह सांस्कृतिक वैशिष्ट्य कथन करतात, ते आहे निसर्गाधारित विश्वास,श्रध्दा यांच्या कल्पनाव्यूहाचे. बहुतेकजण त्याला निसर्गाधारित धर्म असेही संबाेधतात. एडवर्ड टेलरसारख्याने अ‍ॅनिमिझमचे तत्त्व सर्वच आदिवासी जमातींच्या निसर्गाधारित धर्माचा गाभा मानला आहे. पुराणाश्मयुगापासून मानवीसमुहाच्या विकासक्रमात हे तत्त्व प्रमाण मानले गेले आहे. तथापि आदिवासींमधील हा निसर्गाधारित धर्म म्हणून याची संभावना करता येणार नाही. उत्तरकालीन म्हणजे आद्य पाषाणयुगापासून ते धातुयुगापर्यंत या निसर्गाधारित धर्मकल्पनेचा विकास झाला आहे. वास्तविक ही धर्मपूर्व अवस्था आहे. अनेक आदिवासी आज जरी वेगवेगळया धर्मात धर्मांतरीत झालेले असले तरी त्यांचा मूळचा धर्म म्हणजे ही धर्मपूर्व अवस्थाच आहे. या अवस्थेत त्यांच्या विश्वास, श्रध्दा व विधी आहेत, त्या यातु आधारित आहेत. त्यामुळे इथे अ‍ॅनिमिझम ऐवजी यातु-धर्म हा शब्द अधिक समर्पक असेल. ह्या यातुधर्माचे संघटित धर्मसंस्थेत रुपांतर कधीच हाेऊ शकले नाही. गाेंड आदिवासींनी त्यांचा ‘गाेंडी धर्म’ मूळचा धर्म असल्याचे घाेषित करुन रावणाला आद्यपूर्वज मानले आहे. हा गाेंडी धर्म हा यातुधर्माचाच भाग आहे. तरीही ताे संगठीत धर्मसंस्थेत रुपांतरीत हाेऊ शकला नाही. धर्मसंस्थेची मध्यवर्ती संचालकशक्ती पुराेहितवर्गाची असते. गणसमाजाच्या विकासक्रमात आदिवासींमध्ये पुराेहितवर्ग अस्तित्त्वात येवू शकला नाही. त्यांच्यातील भगत मातृसत्ताक वा स्त्रीसत्ताक गणसमाजात प्रथम स्त्री हाेती आणि पुरुषसत्ता आल्यावर पुरुष भगत आले. भगत हे कर्मकांड करीत नसत, आणि आजही करीत नसतात.ते जादूटाेणा करीत असत. आजही तेच करीत असतात. जादूटाेणा ही धर्मपूर्व अवस्था आहे. विषम व शाेषणसंबंधाच्या सामाजिक स्तरीकरणाचा ब-यापैकी अभाव असल्याने काहीएक समतेचा व मुक्तपणाचा आधार या जमातींच्या घडणीच्या आजही टिकून असणा-या अवशेषात प्रकट हाेत असताे.


वेगवेगळया गैर-आदिवासी प्रवाहांनी आदिवासींना वेगवेगळया नावांनी संबाेधले, या नाव प्रदान करण्याच्या प्रक्रियेमागे विवक्षित संस्कृतीकारण हाेते. वसाहतवादविराेधी भारतीय राष्ट—वादी चळवळीत आदिवासींना सामावून घेण्याचा मुद्दा आला तेव्हा त्यांना भारताचे आदिम रहिवासी म्हणून काहीशी मान्यता दिली गेली तरी त्यांची ओळख जंगलक्षे़़ात विखुरलेल्या भिन्न जमाती अशी बहुनामवाची स्थिती कायम राखली गेली. गांधीवादी परिप्रेक्ष्यात या जमाती केवळ आदिवासी ही एक ओळख असलेल्या नव्हत्या, तर त्या हिंदू समाजातील प्रगतीत मागे पडलेल्या विशिष्ट भूभागातील जमाती हाेत्या. गांधीवादी परिभाषेत अस्पृश्यजातींना ‘हरिजन’ आदिवासींना ‘गिरीजन’ अशी संज्ञा प्रदान करण्यात आली. आदिवासी विकासाचा प्रश्न गांधीवादाने भूतदयावादी भूमिकेतून पाहिला. तिस-या दशकात आलेल्या हिंदुत्त्ववादी प्रवाहाने पूर्वपारंपरिक ब्राह्मणी धारणांना काही आधुनिक वसाहतवादी गृहितकांचा आधार देत आदिवासींची ‘वन्य जमाती’ म्हणून संभावना केली. पुढे ‘वनवासी’ हा शब्दप्रयाेग याच आधारावर राष्ट—ीय स्वयंसेवक संघाने वापरावयास सुरुवात केला.साम्राज्यवाद्यांच्या पूर्वी भारतातील ब्राह्मणी धर्मशास्त्रांच्या दृष्टीने आदिवासी हे कमअस्सल मनुष्य हाेते,मनुस्मृतीत त्यांना वर्णबाह्य म्हटले आहे. याची चर्चा न करता हिंदुत्त्ववाद्यांकडून आदिवासी हे हिंदूधर्मीयच आहेत, असे अवास्तविक गृहितकही समर्थनपर मांडले जाऊ लागले. भारतात कम्युनिस्ट चळवळ रुजल्यावर विशेषतः स्वातंत्र्याेत्तर भारतात आदिवासींकडे वर्गीय परिप्रेक्ष्यातून पाहिले गेले. मार्क्सवाद्यांनी औद्याेगिकक्षेत्रात कामगार वर्गीय ट्रेड युनियनची तर जंगलपट्ट्यात आदिवासी शेतमजूरांचे संघटन उभारुन चळवळ करतांना आदिवासीप्रश्नाचे आकलन वर्गीय दाय-यातच ठेवले. औद्याेगिकक्षेत्राच्या तुलनेत जंगलपट्ट्यात व जंगलपट्ट्यानजीकच्या ग्रामीण सामंती जातीयसंबंधातील मागास शेतीव्यवस्थेत बहुसंख्य आदिवासी मजूर राबत असूनही एकांगी वर्गीयदृष्टीमुळे जातीचा सामाजिक पाेत आदिवासी जमातींच्या मुक्तीप्रश्न समजून घेण्यात मार्क्सवाद्यांना विलक्षण मर्यादा पडल्या. एंगेल्सने कल्पिलेल्या ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम’चे अवशेष आदिवासी जनसमुहात शाेधण्याचे प्रयत्नही त्यामुळेच विसंगत ठरले. भारतात जाती व जमाती यांच्या परस्परसंबंधीय विश्लेषणाची जाेड न देताच त्यांनी आदिवासी संस्कृती व नैतिकतेच्या अधःपतनाचा निव्वळ वर्गीय अर्थ लावला. भांडवलशाहीप्रधान औद्याेगिकरण, व्यापारीकरणाच्या प्रक्रियेत भांडवलदारवर्ग, त्याचे मध्यस्थ हे आदिवासींचे शाेषण दमन करतात.त्यांच्या शांत, सरळ व नैतिक जगण्यापासून ते दूरावतात आणि वेश्याव्यवसाय, गुप्तराेग, आर्थिकशाेषण व नैतिकपतन यांचे बळी ठरतात. अशी अपुरी मीमांसा यातून पुढे आली. परंतु सत्तरीच्या दशकात महाराष्टात अपारंपरिक डाव्या चळवळीने दिलेले याेगदानही तितकेच उल्लेखनीय आहे. अपारंपरिक डाव्यांच्या प्रभावाने आदिवासी या संज्ञेचा पुकारा करीत आदिवासींची चळवळ गतिमान झाली. आणि मुख्यत्वेकरुन त्याचसमयाला समांतरपणे सुरु असलेल्या दलितचळवळीच्या प्रभावातून आदिवासी अस्मितेच्या चर्चाविश्वाला चालना मिळाली.


मराठी साहित्यात दलित साहित्यचळवळीच्या प्रभावाने आदिवासींमधील नवशिक्षितवर्गातील लेखकांना प्रेरणा मिळाली. महाराष्टतील बहुतेक आदिवासी साहित्यिक, लेखक,कलावंत यांनी दलित साहित्याचे प्रेरणास्त्राेत असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनाच आदिवासी साहित्याची मूलप्रेरणा मानली आहे. त्याचबराेबर आदिवासी साहित्याच्या पृथकपणाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. भारतीयस्तरावरील मराठीतेर आदिवासी साहित्यिकांनी व्यापक आदिवासी कला-साहित्यचळवळीच्या विकासासाठी मराठीतील या आदिवासी साहित्यिकांची ही भूमिका स्वीकारण्याबाबत अद्यापही गांभिर्य दाखविलेले नाही. याउलट ईशान्येकडील राज्यातील आदिवासीचळवळीचे नेते आणि बुध्दिजीवींनी ही भूमिकाच प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे नाकारली आहे. जातीव्यवस्थेशी आदिवासींचा काहीएक संबंध नसून जातीमुक्तीचे तत्त्वज्ञान असलेल्या आंबेडकरवादाच्या आधारावर आदिवासींचा मुक्तीप्रश्न सूटणार नाही असे त्यांचे प्रतिपादन आहे. जातीव्यवस्था आणि आदिवासीजमाती हे परस्पराशी काेणताही संबंध नसणारे दाेन परस्परभिन्न विभाग असल्याची ही त्यांची भूमिका मूलतः ऐतिहासिक तसेच वर्तमानयथार्थाला धरुन नाही. आदिवासीजमातींचा जातीव्यवस्थेशी असलेला जैविकसंबंध इतिहासकालापासून ते आजपर्यंत उकलून दाखवित आदिवासींचे प्रबाेधन करीत त्यांच्या केवळ आर्थिकप्रश्नावर लढे करणा-या चळवळींना दलितचळवळीशी जाेडण्याचा प्रयत्न दलितचळवळींच्या नेते, कार्यकर्ते, विचारवंत आदींच्या स्तराकडून पुरेसा झाला नाही, हे तथ्य आहे. दलित पंॅंथरच्या चळवळीत दलित या शब्दाचा अर्थ केवळ पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यजातीय असा न घेता त्याचा व्यापक अर्थ सर्वहारा जाती जमाती असा विकसित केला गेला. त्यात आदिवासींचा समावेश करण्यात आला हाेता. तथापि यासंदर्भात नव्याने जातीवर्गव्यवस्थेची सैध्दांतिक मीमांसा करण्याचा फारसा प्रयास आंबेडकरी बुध्दिजीवीवर्गाकडून झाल्याचे दिसत नाही.


वास्तविक आदिवासी ही जात किंवा जाती नसून जमातींचा सम्मुचय आहे. एकसंघ जात वा जमात म्हणून त्यांचा विचार करता येणार नाही. भारतात अनेकविध ठिकाणी वास्तव्य करुन राहणा-या अनेक जमातींची सामाईक ओळख आदिवासी या शब्दात याेजली जात आहे. आणि ती याेग्यही आहे. अमेरिकेत गाे-या साम्राज्यवाद्यांनी तेथील आदिवासीजमातींचा समूळ वंशसंहार केला. भारतात आर्य वा नंतरच्या आक्रमकांनी इथल्या आदिवासी जमातींचा याप्रकारे वंशसंहार केला नाही. मात्र वर्णजातीव्यवस्थेच्या रचनेत या जमातींना सामिल करण्याची सर्वंकष प्रक्रिया प्रारंभाची काही शतके सुरु राहिली. जातीसमाजाच्या संसर्गाने अनेकठिकाणी आदिवासी जमाती जातींप्रमाणे व्यवहार करु लागल्या. उच्चनीच भेदभावाची मानसिकता, अस्पृश्यजातींशी अस्पृश्यतेचा व्यवहार इ. बाबी त्यांच्यात रुजल्या आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या साम्राज्यशाहीशी प्रथम आदिवासी जमाती अविरत झुंजल्या. वसाहतकाळानंतरच्या आधुनिक भांडवलशाहीचे आणि स्वातंत्र्याेत्तर भारतातील लाेकशाही राज्यप्रारुपातील भांडवलशाहीचे आदिवासी सातत्याने बळी ठरले आहे. जातीशासनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आदिवासीजमाती वर्गभेदाने ग्रासल्या गेल्या आहेत. म्हणून जातीबराेबरच वर्गीय परिमाणांचा संयुक्तपणे विचार करणे भाग आहे. आदिवासी संस्कृतींवर ब्राह्मणी संस्कृतीनंतर इतर व पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण झाल्याने त्यांच्यातील अस्सल व नंतरच्या काळात संस्कारित झालेली सांस्कृतिकता यांचे पेचाचे व्दंव्द साकारले आहे. तथापि भारताचे पायाभूत समाजवास्तव असणा-या जातीव्यवस्थेच्या अनुषंगाने जातीरचना आणि आदिवासी जमाती यांच्यातील संबंधाची उकल करणे हे जास्त मूलभूत काम आहे. जातीव्यवस्थेची घडण हाेत असताना ज्या जंगलपटृटयातील प्राचीन जमातींनी जातीय आकृतीबंधाच्या समाजरचनेत समाविष्ट हाेण्याचे नाकारले, त्यासाठी त्यांनी जातीव्यवस्थेच्या शासक ब्राह्मणादी उच्चजातींशी संघर्ष केला, आपली स्वतंत्र गणसमाजाची जमातीय वैशिष्ट्ये सातत्याने टिकवून ठेवली. आणि त्यांच्या या अलग व स्वतंत्र राहण्याच्या तसेच बंडखाेरीच्या कारणांबराेबरच त्यांना जातीसमाजापासून अलगपणे दूर जंगलपटृटयात नियंत्रित ठेवण्याच्या उच्चजातीय शासकाच्या संस्थात्मक प्रयत्नाचेही ऐतिहासिक विश्लेषण जातीसमाजातील शाेषितपीडीत अस्पृश्य व इतर कनिष्ठजाती, भटक्या जमाती आणि आदिवासीजमाती यांच्यातील जातीव्यवस्थाक अनुबंध स्पष्टपणे अधाेरेखित करु शकते. अपवादवगळता अश्याप्रकारच्या संशाेधनाभ्यासाच्या अभावात भारतातील समाजपरिवर्तक चळवळी कार्यरत राहिल्या.


फुले-आंबेडकरांच्या परिप्रेक्ष्यात आदिवासी हे जातीव्यवस्थेचे अंतिम शाेषितपीडीत आहेत.फुले यांनी शुद्रातिशुद्र यांच्या एकत्रित चळवळीत अस्पृश्यजातींबराेबर आदिवासीजमातींना अतिशुद्र गटात टाकले. कारण ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी आदिवासीजमातींना वर्णबाह्य म्हणजेच अतिशुद्रांचा दर्जा बहाल केला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीविश्लेषणात आदिवासी हे अतिशुद्र असले तरी ते जातीव्यवस्थेच्या सीमेवर उभे आहेत. त्यांनी जातीरचनात्मक अत्यंत बहिष्कृत व बंदिस्त गटात आदिवासींचा विचार अस्पृश्य जातीनंतर केला आहे. जातीव्यवस्थाक खेड्याच्या रचनेत गावकुसाच्या आतील सवर्ण जातीउतरंड असूनही तिचे गावकुसाच्या बाहेरील अवर्णातील अस्पृश्य जातींशी शत्रुवत हितसंबंध राहिले आहेत. अवर्णातील भटक्या जमाती आणि आदिवासीजमाती गावकुसाच्या बाहेरील हाेत्या.पण त्या अस्पृश्य जातींप्रमाणे गावकुसाच्या बाहेरील वस्त्यांमध्ये बहिष्कृत नव्हत्या. त्या गावकुसाच्या आतील सवर्णजातींच्या दृष्टीने स्पृश्यही राहिल्या आहेत. तुलनेने जातीव्यवस्थेची आत्यंतिक कठाेर निर्बंधने अस्पृश्य जातींवरच लादलेली असल्याने जातीमुक्ती लढ्याचे अग्रदल अस्पृश्य जातीच असतील. आणि क्रमशः भटक्या जमाती आणि आदिवासीजमाती तसेच सवर्ण ओबीसीजाती या त्यांच्या मित्रशक्ती असतील, अशी शास्त्रीय व्यूहरचना डाॅ. आंबेडकरांनी दिग्दर्शित केली आहे. राज्यघटना तयार करताना त्यांनी अस्पृश्य जाती(SC)बराेबरच आदिवासीजमातीं(ST)करीता रिझर्वेशनची तरतूद म्हणूनच केली. त्यांनी हिदू काेड बिलही आदिवासींना लागू करण्याची तरतूद केली हाेती परंतु तत्कालीन आदिवासी नेतृत्त्वाने त्याला विराेध केला.ताे विराेध आजतागायत सुरु राहिला आहे. आदिवासी स्त्री अनेकजमातीत पुरुषवर्चस्वाच्या अनेक रूढीप्रथापरंपरेत कैद आहे. जमातीच्या पितृसत्ताक वैवाहिक कायद्यातून तिची सुटका करण्यासाठी हिदू काेड बिल क्रांतीकारी ठरणार आहे. हिदू काेड बिल लागू करण्यातून आदिवासींचे हिंदूकरण हाेते किंवा आदिवासी स्त्री ही जमातीय संस्कृतीत अधिक स्वतंत्रच आहे अशात-हेचे केले गेलेले युक्तिवाद विपर्यस्त व यथार्थहीन आहेत. आदिवासी जमातीमधील समता ही मर्यादित आहे, किंबहुना त्यांच्यामधील स्त्री-पुरुष विषमतेचे निराकरण केल्याशिवाय या समतेचा खरा मानदंड उभा करता येणार नाही. जमातीय पुरुषवर्चस्व आणि जातीय पितृसत्ता यांच्यात फरक असला तरी जातीपितृसत्तेच्या निराकरणाच्या उपाययाेजना जातीव्यवस्थेची वसाहत बनलेल्या व उच्चजातीय शासकाच्या संस्थात्मक नियंत्रणवर्चस्वात असलेल्या आदिवासी जमातीतील पुरुषवर्चस्व माेडीत काढण्यास तितक्याच उपयुक्त ठरतील.


भारतीय आदिवासी हे मूळचे आर्यपूर्व प्रगत संस्कृतीचे निर्माते हाेते. हे खरे परंतु आर्य आल्यानंतर ते सातत्याने आर्यधर्माचे व चातुर्वर्ण्याचे विराेधात राहिले. त्यांच्या या स्वतं़त्र व आद्य मर्यादित समतेच्या संस्कृतीचा हा मुख्यगाभा आहे. घटनेत नमूद केल्याप्रमाणे ही केवळ इतर काेणत्याही ग्रामीण वा नागरी संस्कृतीप्रमाणे नुसतीच वेगळी/ भिन्न संस्कृती नसून ती स्वतंत्र व सर्वच संस्कृतीची प्रारंभिक टप्प्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणता येईल. नव्हे तर आदिवासी संस्कृतीव्यवहारातील धर्मविहीनता, कर्मकांडशून्यता आणि समतेची आदिमता ही आजच्या मानवमुक्तीकारक सांस्कृतिक पर्यायाच्या नवरचनेसाठी पथदर्शक आहे. यात आणखी महत्त्वपूर्ण गाेष्ट म्हणजे आदिवासींची निसर्गापगती असलेली मैत्री व सहकार्याची जीवनदृष्टी ही या संस्कृतीचा जैवभाग आहे. पाश्चात्य विज्ञानदृष्टीला ही विसंगत अशी परिदृष्टी आहे. निसर्गावर मात करीत विज्ञानतंत्रज्ञान विकसित करण्याच्या मार्गातील दुष्परिणामाचा परिहार ही दृष्टी करु शकेल. ह्याच मैत्री व सहकार्याच्या पायावर मानवीसंबंध असले पाहिजे, असेही तत्त्व या जीवनदृष्टीतून जातीव्यवस्थाक ब्राह्मणी व भांडवली तसेच पुरुषसत्ताक भेदभावात्मक, विषम व शाेषणमूलक सामाजिकसंबंधांना पर्यायीतत्त्व म्हणून पुढे येते. मला वाटते की, हाच आदिवासी अस्मितेचा व्यापक सर्वंकष तात्त्विक असला पाहिजे. जागतिकस्तरावर साम्राज्यवादी, वंशवादी संस्कृतीविराेधात आदिवासी संस्कृतीचा सर्जकशाेध घेणे याकरीता गरजेचे आहे.साहित्यशास्त्राच्या पटलावर दलित साहित्य, काळे (निग्राे हा शब्द मानखंडना करणारा असल्याने ब्लॅक हेच नामाभिधान समर्पक आहे.) साहित्य या देशी-आंतरदेशी साहित्यप्रवाहाशी आदिवासी साहित्याचे जैविक नाते जुळून परस्परसंबंधप्रभावातून तिन्ही प्रवाहांना वैश्विक परिमाण प्राप्त हाेईल.

●संदर्भ-

▼गाेरे, डाॅ. गाेविंद, भारतीय आदिवासी समाज व संस्कृती, आदिम प्रका. पुणे,1975
http://www.tribalzone.net/people/jaipalsingh.htm
Hewitt,J.F., The Ruling Races of Pre Historic Times in India, South-Western Asia and Southern     Europe, Oriental Publishers,Delhi,1972
Basu,D.D., Introduction to the Constitution of India, Prentice Hall of India Ltd., New Delhi,1989
▼देशमुख, प्र.रा., सिंधु संस्कृती, ऋग्वेद व हिंदू संस्कृती, प्राज्ञ पाठ्य शाळा मंडळ, वाई,1966
▼वर्धन, ए.बी., आदिवासींची न सुटलेली समस्या, प्रका.स.ना.भालेरावख्मुंबई,1976
▼ गाेखले,डाॅ. प्रदीप, विषमतेचा पुरस्कर्ता मनू, सुगावा प्रका.,पुणे,1983
▼ खैरमाेडे चांगदेव भगवानराव, डाॅ. आंबेडकर आणि हिंदू काेड बिल, सुगावा प्रका.,पुणे,1992
▼ \डके, यशवंत दिनकर, महात्मा फुले समग्र वाडःमय, महाराष्ट— राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,1991
Ambedkar,dr. Babasaheb: Writings and Speeches, Vol.5, Education Department, Govt. of Maharashtra;1989

(लेखक क. भा. प. महाविद्यालय इस्लामपूर येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत.)