१.सगळेच पर्याय संपले आहेत

कवितेच्या ओळीत दिसेन
म्हटलं तर त्या ओळीच
गायब केल्या जाताहेत
जरा कुठे मुक्त श्वास
घेऊ म्हटले तर
हवेत जहर फवारताहेत
माझी स्वतःची वाट
बनवून चालेन म्हटलं तर
वाटेवर सुरुंग पेरताहेत
माझ्या आकाशात
उंच भरारी घेईन म्हटलं तर
माझे पंखच छाटताहेत
मी जगावे तरी कसे
ही सभोवतालची छळव्यवस्था
घोटत आहे माझा गळा
सगळेच पर्याय संपले आहेत
आता कुठलीही तडजोड न करता
शस्त्रच उपसावे म्हणते मीgartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

२. म्हणूनच निश्चिंत आहे

सुरुय दिवसरात्र
माझ्या कवितेची झाडाझडती
माझ्या कवितेत
हेच का
तेच का
हे नको होते
ते नको होते
माझे आयुष्य आहे
ते कसे जगायचे
हे मी ठरवेन
माझी कविता
कशी लिहायची हेही
मीच ठरवेन
नका करु लुडबुड
माझ्या आयुष्यात
आणि कवितेतही
विसरली नाहीय मी भूतकाळ
छळतोय मला वर्तमान
भविष्याचा वेधही आहे
माझ्या कवितेत
मी ठाम आहे माझ्या भूमिकेशी
म्हणूनच निश्चिंत आहे
माझा आणि माझ्या
कवितेचाही काल

३. ही अंतिम लढाई

मला जगण्याचे
आणि लढण्याचे बळ
तूच तर दिले आहे
माझी कविता
स्फोटच झालीय  सुरुंगाचा
कितीतही दमछाक झाली तरी
आता माघारी फिरणे नाही
हे उठावांचे वादळ
भरुन आलेय माझ्यात
आणि कवितेतही
ठेवीले अनंते
असे नाही जगणार आता मी
मी पुकारलाय एल्गार
या शोषणकर्त्या व्यवस्थेविरुद्ध
आता होणारच
ही अंतिम लढाई
माझ्या अस्मितेची आणि अस्तित्वाची!

४. बेरजेचे दिवस

कितीही उत्खनन
करीत बसलात माझ्या आयुष्याचे
तरीही मी थांबणार नाही
माझी लढाई
माझे रणांगण
नेहमीच तापलेले
शस्त्रही परजलेले
किती काळ रोखणार आहात
माझ्या विजयोत्सोहाला
मी पचवले आहे
कित्येक पराभव
आता अटळ आहे
तुमचाही पराभव
मी नाही जगत
स्वप्नांच्या दुनियेत
जे जगले
जे साहिले
ते ते लक्षात ठेवलेय मी
हिशेबच करायचाय मला
या छळणा-या व्यवस्थेचा
संपलीय आता
दुःखाची वजाबाकी
बेरजेचे दिवस येतील
आता माझ्या वाटेला

५. खूपच परेशान आहेत आजकाल

अपरिहार्य आहे
काटेरी वाटेवर चालताना
पावलं रक्तबंबाळ होणं
तसेच अटळही आहे
कवितेतनं उठाव होणं
माझा अट्टाहास नाही
कुठलाही की,मी सांगेन
तेव्हाच शब्दांनी पेटले पाहिजे
शब्दांना मी दिलेय स्वातंत्र्य
त्यांनी पेटावे त्यांच्या इच्छेनं
एकदा का पेटले
शब्द की,
पेटतील शोषित,पिडीत सारे
अपरिहार्य असेल तेव्हा
महायुद्ध
आणि क्रांतीही
कुठल्याही दमन करणा-या
शासन प्रणालीचे अस्तित्वच
येईल धोक्यात
स्वतःला अमरत्वाचा पट्टा
बांधून फिरणारे सत्ताधिश
खूपच परेशान आहेत आजकाल

कवयित्री जळगाव जिल्ह्यातील असून त्या मराठीतील आघाडीच्या कवयित्री आहेत.