समीना दलवाई यांचे भटकभवानी हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्राच्या वाङमय प्रकाशन क्षेत्रात अल्पावधीत स्वत:चा वेगळा ठसा उमठविणारे हरिती प्रकाशन ही संस्था या पुस्तकाचे प्रकाशन करीत आहे.

समीना दलवाई या नव्या पिढीतील स्त्रीवादी भूमिकेतून लेखन करणारी स्वतंत्र शैलीची लेखिका आहे. डाव्या,समाजवादी प्रवाहांशी जोडून घेत जात-जमातवादी आणि पितृसत्तेच्या राजकारणाविरोधात सातत्याने सक्रिय राहिली आहे.

भटकभवानी हा लेखसंग्रह आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. समीनाचं लिखाण खरं, भिडणारं, न घाबरणारं, प्रश्न विचाणारं, विचार करायला प्रवृत्त करणारं आणि आत्मनिरीक्षण करायला भाग पाडणारं असं आहे. मला स्वतःला वाचताना अनेक प्रश्न पडले आणि अनेक लेखांनी अस्वस्थही केलं. का आपण समाज म्हणून इतके दुटप्पी आहोत? का आपण सगळ्यांना सामावून घेत नाही? का आपण इतके विखुरलेले आहोत? असे अनेक प्रश्न सतावत आहेत. हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने आवर्जुन वाचावं… त्यामुळे आपण स्वतः अधिक प्रगल्भ होऊ…

गीतांजली कुलकर्णी

  (प्रसिद्ध अभिनेत्री)

निरीक्षण, अनुभव आणि त्या अनुभवांकडे पाहण्याची तिची जी स्वतंत्र वैचारिक दृष्टी आहे त्यातून तिने भवतालच्या जगाचे कोंडी करणारे वास्तव आपल्या लेखांतून मांडले आहे. या लेखांचे संग्रहरुप म्हणजे भटकभवानी. भारतीय समाजात विविध पातळ्यांवर जात,जमातवाद आणि पितृसत्तेचे जे अनुभव येतात त्याचा वेध तिने अचूकपणे या लेखांतून घेतला आहे. शिवाय पुढे जाण्याचा विश्वास देणारेही रचनात्मक व्यवहार घडत असतात त्याचीही नोंद तिने आपल्या लेखांतून घेतली आहे. या पुस्तकात १० विभागात हे लेख वाचता येणार आहेत.

भटकभवानी(लेखसंग्रह)
समीना दलवाई 
हरिती पब्लिकेशन्स
पृष्ठे – १८४
किंमत – रु.२५०
ऑनलाईन खरेदीची लिंक-  
https://pustakshop.com/index.php?id_product=4806&rewrite=&controller=product