मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाचे अभ्यासक, तरुण विचारवंत सचिन गरुड यांची तीन भाषणे मावळाई प्रकाशनने पुस्तकरुपाने आणली आहेत. या तीन भाषणांचे संकलन असलेले ‘आंबेडकर पर्वारंभाची शताब्दी : तीन भाषणे’ हे पुस्तक मावळाईने अलिकडेच प्रकाशित केले आहे.

महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा इतर कारणामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध विषयावर व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात .त्यामध्ये काही भाषणे खरोखरच खूप अभ्यासपूर्ण असतात. ते भाषण संपल्यानंतर उपस्थित श्रोते टाळ्या वाजून वक्त्याचे कौतुक करतात त्याला धन्यवाद देतात. त्या भाषणाचा आपल्या मनावर थोड्याच कालावधीसाठी  प्रभाव राहतो.

नंतर आपण ते सारे विसरूनही जातो. वक्ता बोलण्याच्या ओघा मध्ये खूप सारे दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण संदर्भ देत असतो. आपण सगळेच काही टिपणे काढत नाहीत आणि काढले तरी ते आपल्या संग्रही राहतीलच याची काही शक्यता नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला संदर्भ हवे असतात, तेव्हा मात्र ते मिळवण्यात खूप अडचणी येतात. म्हणून अशी जी काही मोजकी अभ्यासपूर्ण भाषणे आहेत ती पुस्तक रूपाने येणे फार गरजेचे आहे. या अर्थाने हे असे पुस्तक येणे महत्त्वपूर्ण आहे. हे पुस्तक जरी त्यांनी दिलेल्या भाषणावर आधारित असले ,तरी त्याला लेखाचे स्वरूप देण्यात आलेले आहे.

सदर पुस्तकामध्ये एकूण ३ भाषणे आणि ९ परिशिष्टे आहेत.   

आंबेडकर पर्वारंभाची शताब्दी: तीन भाषणे.
सचिन गरुड.

प्रकाशक :मावळाई प्रकाशन शिरूर ,पुणे.

पाने: 204 .
किंमत: 250 रुपये मात्र