1. ऐक सखे

ऐक सखे!एक झेप तुझी
खुल्या आसमंती असू दे
भेदभाव व्यर्थ आहे
स्वाभिमानाचे बीज अंकुरू दे.

ऐक सखे! तु चाल पुढे
बंधने तुझे सैल असू दे
तु तुझे अस्तित्व दाखव
जरी पुरुषी मक्तेदारी असू दे

ऐक सखे!तू शक्ती आहेस
अंतरंगात धैर्य तुझ्या ओतपोत असू दे
पायी बंधन बेड्या अडकवू नको
जगण्याला उर्मी असू दे .

ऐक सखे!तू ठाम रहा
जीवन तुझे साहसी असू दे
समाज बांधील आहे बंधने लादण्याला
तुला कुबड्या अमान्य असू दे.

ऐक सखे!तुझा झोक
व्यर्थ झिजन्याकडे नसू दे .
तुझ्या अधिकारांची
अनुभूती तुझ्या मनी असू दे .gartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

2.निसर्ग गाभ्यातला एक जीव

ह्या निसर्ग गाभ्यातला एक जीव
मानव रुपी का झाला असा क्रूर

भावनांच्या जाणिवेचं ना राहिलं त्याला भान
स्वार्थापोटी विसरला तो थोर मोठ्यांचा मान

केला त्याने स्वताचा सुद्धा उहापोह
इतरांच्या आयुष्याचा तर केलाच त्याने गढूळ डोह

विसरला तो मानव स्त्रीत्वाचा आदर करणं
वासानेपोटी केले त्याने सारखेच जगणं मरणं

सदरक्षणायचा तर जसा विसरच पडला
आपल्याच भाव – बंधुसाठी राक्षस बनला

जाती धर्मासाठी तर असा लढतो आहे
जसा भारत मातेचा नाराच कुठे हरवला

निसर्गाची गरज आहे पुढची निर्मिती ,परंतु
पिढ्यानपिढ्या होत आहे क्रूरतेची व्याप्ती

कोठून तयार झाले हे घाणेरड्या विचारांचे रोपटे
या रोपट्याचे कसे होईल सृजनशील वृक्ष