1
शहरांना यंत्रे चालवतात
आणि माणसे यंत्रांना
भूक दोघांची भाषा आहे
तरीही यंत्रे मालकाचेच ऐकतात
2
बांधकाम साईटवर कामगाराचा
अपघाती मृत्यू झाला
काम त्या दिवशी ही चालूच होते
एके दिवशी मालकाच्या मृत्यूची खबर आली
काम महिनाभर बंद आहे
3
महानगरांच बोट पकडून
डोक्यावर बिढार घेवुन आलेले कित्येक लोक
बिन चेहऱ्याची असतात
तुमच्यासाठी नक्कीच
स्वस्त असतील त्यांची स्वप्ने
तरीही ती पूर्ण होता होता
त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली असते

(कवी धुळेस्थित असून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहेत)