मराठी अनुवाद – महेश पेडणेकर

भारतीयांना ‘बहिष्कार’हा शब्द नवीन नाही. ‘बहिष्कार’ या शब्दाचा परिचय मला वाटतं आपल्याला स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांनी करून दिला. ब्रिटिशांच्या वासाहतिक धोरणांच्या विरोधात असहमती-असहकार दर्शवण्यासाठी एक व्यूहरचना, हत्यार  म्हणून याचा वापर केला गेला. कोणतीही कृती जी तत्कालीन धर्म-संस्कृती आणि स्वदेशीच्या विरोधात वाटत होती त्याला बहिष्काराचा सामना करावा लागला होता. बहिष्कार हे एक सशक्त माध्यम आहे. बहिष्कार हा व्यक्तिगत मतभेद आणि नकार याची अभिव्यक्ती बनू शकतो.работни обувки fw34 steelite lusum s1p 38
normamascellani.it
covorase man
bayern münchen spieler
karl sneakers
addobbi fai da te matrimonio
prestonstadler.com
spoločenské šaty pre moletky
fingateau.com
lifeonthevineministries.com

बऱ्याच वेळा बहिष्कार हे अस्त्र बहुसंख्यांकांनी  अल्पसंख्यांकांच्या विरोधात वापरलेले दिसते. बहिष्कार ही क्वचितच एकांगी कृती राहिलेले आहे; ती बऱ्याचवेळा एखादी विचारधारा नाकारण्यासाठी किंवा तिचे पाठराखण, सरंक्षण करणारी अशी बहुआयामी कृती म्हणून कार्यरत  राहिलेली दिसते.

अलीकडे जणू बहिष्काराची लाटच आलेली दिसते. भारतीय  चित्रपट सृष्ट्रीतील एका घटकावर विशेषतः जो हिंदीभाषिक चित्रपट निर्माण करतो त्याच्या विरोधात ती निर्माण झालेली दिसते. हिंदी चित्रपटसृष्टीचा एकूणच भारतीय प्रेक्षकावरील प्रभाव आणि पोच याचा विचार करता बहिष्कारातून दिला जाणारा संदेश आणि त्यातून उद्भवणारे परिणाम हे मोठया प्रेक्षक वर्गापर्यंत पसरतात.

चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातो ही गोष्ट सर्वज्ञात आहे. पण त्याची एक दुसरी झटका देणारी(flip side)बाजूपण असू शकते का? आणि चित्रपट निर्माते सुद्धा बहिष्काराचे हत्यार वापरतात का?

चित्रपट समाजासाठी बनवले जातात असे चित्रपट निर्माते सांगत आलेले आहेत. चित्रपट निर्मितीमागे अनेक हेतू असू शकतात. पण प्रामुख्याने दोन हेतू सांगितले जातात. त्यापैकी एक म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे आणि दुसरा हेतू म्हणजे कमाई करणे. मग ते चित्रपट वास्तव घटनांपासून कितीही  तुटलेले आणि विपर्यस्त असले तरी हरकत नाही. चित्रपटातील कथानक चुकून वास्तवाशी मेळ घालणारे असले तर तो केवळ  योगायोग समजावा असा इशारा देण्यामध्ये ते  विसरत नाहीत.

चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब आहे असे मानले जाते. समाज कळत- नकळत जाणते -अजाणतेपणी चित्रपटाची संहिता तयार करण्यामध्ये एक भूमिका निभावत असतो आणि चित्रपट त्याच्या जगण्याचा भाग देखील असतो. चित्रपट निर्मात्यांना याची जाणीव सुध्दा असते आणि समाजातील घटनांचा उपयोग ते  एक  प्रतिबिंबात्मक आकलन आणि प्रतिसृष्टी तयार करून समाजावर गारुड करत असतात. ही  प्रतिसृष्टी बऱ्याचदा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या सामाजिक रचनेशी  विसंगत असते, वास्तवदर्शी नसते. बऱ्याच वेळेला ती आहे त्यापेक्षा मोठी करून सांगितली -दाखवली जाते किंवा आहे त्यापेक्षा विकृत-विपर्यस्त करून दाखवली जाते.

समाजातील वास्तववादी घटनांचा उपयोग करणे हे अपघातात्मक  आणि हेतुविरहित नसते. प्रेक्षक हेच अंतिम सहमती देणारे असतात त्यामुळे भारतीय चित्रपट निर्माते प्रेक्षकांच्या अभिरुचीला पसंत पडेल अशाच चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार करतात.

चित्रपटाच्या कथानकामध्ये एकसुरीपणा असू नये याबाबत ते भयंकर जागरूक असतात. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता जात-वर्गीय,स्त्रिविरोधी(लैंगिक)राहिलेली आहे. याचे भान ठेवून भारतीय चित्रपट निर्माते कोणता आशय निवडायचा आणि कोणता नाकारायचा याबद्दल जागरूक असतात.

भारतीय प्रेक्षकांमध्ये केवळ विविधता नाहीय तर  त्याचे सामाजिक-आर्थिक उतरंडीतील स्थान आणि शोषण हे विषम आहे. भारतीय चित्रपट सृष्टीने एक शतक पार केलेले असले तरी भारतीयांना जोडणारा खरा सामाईक धागा पकडून त्यावर चित्रपट बनवण्याचे धाडस अजून कोणी केलेले नाही. त्यापेक्षा भारतीय चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांची पारंपरिक, प्रस्थापित मानसिकता विचारात घेऊन त्यावर चित्रपट बनवणे सोयीचे जाते. हा पारंपरिक प्रेक्षक सामाजिक-सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या उच्चजातीय उच्चभ्रू राहिलेला आहे. भारताच्या सांस्कृतिक विविधतेची तुलना करता ह्या उच्चभ्रू प्रेक्षकांची (catered audience)  संख्या फारच नगण्य आहे. तरीदेखील एवढ्या अल्प,नगण्य असलेला वर्ग म्हणजे  अखंड भारतीय प्रेक्षक आहे असा प्रचार करण्यामध्ये आणि या उच्चभ्रू प्रेक्षकांचे  (catereद audience)   सांस्कृतिक चोचले पुरवण्यामध्ये  भारतीय चित्रपट निर्माते पुढाकारावर राहिले आहेत.

या  सगळ्याची सुरवात मुळात पुराणकथांवर (myghology)आधारित चित्रपट   बनवण्यापासून झाली. विशेषतः हिंदू पुराणकथा . या पूर्वीच्या हिंदी- मराठी  चित्रपटांच्या संहितेवर हिंदू पुराणकथांचे वर्चस्व राहिलेले आहे. ‘राजा हरिश्चंद्र’(1913), ’लंका दहन’(1917), ‘श्रीकृष्ण जन्म’(1918), ‘शाकुंतल’(1943), ‘श्रीगणेश महिमा’(1950), ‘लक्ष्मी नारायण’(1951), ‘हनुमान पाताळ-विजय’(1950), आणि सर्वात जास्त चाललेले ‘तुलसी विवाह’(1971), ‘जय संतोषी माता’(1975) ही काही वानगी दाखल उदाहरणे देता येतील.

जरी चित्रपट निर्माते सतत अधिकारवाणीने सांगत असले तरी मनोरंजन हा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून चित्रपट निर्मिती अथवा विक्री करत नाहीत. चित्रपटांमध्ये क्वचितच मनोरंजन मूल्य आणि हेतू असतो. चित्रपट ही एक धार्मिक-सामाजिक राजकारण समजून ते बनवले जातात. चित्रपटांवर एका विशिष्ट धर्माचे वर्चस्व असणे म्हणजे हिंदू धर्माची मूल्ये पुनर्जीवित आणि पुनर्प्रस्थापित करणे होय. पण अशा चित्रपटांविरोधात संताप आणि विरोध व्यक्त करणे सर्वसामान्य जनतेकडून क्वचितच झालेले दिसते. हा जो उच्चभ्रू प्रेक्षक आहे तो आपल्या आयुष्याचे पडद्यावरील प्रतिबिंब बघून सुखावतो पण  इतरांना,वंचितांना  त्याबद्दल प्रश्न विचारण्याचे धाडस करु देत नाही की एवढ्या मोठ्या वर्गाला चित्रपटाच्या संहितेतून-कथानकातून गायब  कसे केले जाते? आणि ह्या वर्गाची  सातत्याने विकृत,भोंगळ प्रतिमा  कशी रंगवली जाते?

शिवाय असे असून सुद्धा दुसऱ्या  मुस्लि,म ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातील सांस्कृतिक मूल्यांचा गौरव करणारे चित्रपट सापडणे अतिशय कठीण आणि तेवढेच प्रासंगिक आहे. म्हणून ‘अलिफ लैला’(1953), ‘अल्लाउद्दीन और जादुई चिराग’(1956), ‘मुघल-ए-आजम’(1960), ‘पाकीजा’(1972), ‘निकाह’ (1982), ‘उमराव जान’(1981), ‘जुली’(1975), ‘अशोका’(2001), ‘पाप’(2005), ‘फाइंडिंग फॅनी’ (2014), डेढ इश्किया’(2014), ‘पाप’(2014)  इ.सांगता येतील. भारतीय चित्रपट प्रेक्षकांना पडद्यावर ही धार्मिक विविधता स्विकारायला आणि आत्मसात करायला क्वचितच संधी देते. भारतीय चित्रपट निर्माते त्यापेक्षा इतर धर्मातील मूल्य व्यवस्थेचे दोष दाखवण्याबाबत पुढाकारावर असतात. त्यांचबरोबर अल्पसंख्यांक धर्मियांवर हिंदी चित्रपट निर्मात्यांनी एक अघोषित बंदी घातली आहे आणि  त्यांची बदनाम प्रतिमा सातत्याने दाखवले जाते. चित्रपट निर्मात्यानी  धर्माप्रमाणे ‘जात’ ही सुद्धा एक सामाजिक सांस्कृतिक वास्तव आहे हे समजून न घेता त्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न आणि प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. देशभक्ती, शेतकरी ,सैनिक, गरिबी ,जात- जमातीय दंगली, विषमता आणि अन्याय यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या सामाजिक -आर्थिक वास्तवाचा भाग म्हणून गरिबी ही चित्रपटा द्वारे दाखवली गेली. ‘नीचा नगर’ (1946)चित्रपट ज्यामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी आणि दोन भौगोलिक वस्तीचे चित्रण दाखवण्यात  आले. उचा नगर मध्ये भौगोलिक दृष्ट्या संपन्न प्रदेश दाखवण्यात आला आणि या उच्च -जातीय वर्गाचे सांडपाणी नीचा  नगर मधील (जे उताराला वसलेले आहे) वस्तीमध्ये वळवताना दाखवण्यात आले. या चित्रपटांमध्ये नीचा नगर वस्तीतील रहिवाशांनी मोबदल्याच्या बदल्यात ही सांडपाणी साफ करावी ते करणे योग्य आहे हे समजवण्याचा प्रयत्न केला गेला. या चित्रपटांमध्ये घाण, प्रदूषण,सांडपाणी, रोग आणि सिगरेट पिणारा आंदोलक जो खालच्या वर्गाचा आहे त्याचे चित्रण दाखवले आहे पण हाच चित्रपट या स्थानिक लोकांची भौगोलिक आणि जातीय उतरंड याकडे कानाडोळा करते दुर्लक्ष करते.

‘दो बिगा जमीन’ (1953) ही एका शेतकऱ्याची दयनीय आणि दारुण अवस्था दाखवणारा चित्रपट आहे. जात आणि जमीन यांचा संबंध एकजीव आणि अभिन्न आहेत त्याचे कारण जातीय -सामाजिक रचनेतून ते निर्माण झालेले आहेत. तरीसुद्धा त्यांचा सहसंबंध दाखवण्याबाबत चित्रपटांमध्ये काहीच उल्लेख येत नाही. मदर इंडिया (1957)हा असाच एक महत्त्वाचा चित्रपट ;जो कर्जग्रस्त शेतकऱ्याचा विषय मांडतो. पण शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाच्या मूळ कारणांकडे तो डोळेझाक दुर्लक्ष करतो. ‘नया दौर’ (1977) हा एक श्रमिक वर्गाचे कष्ट आणि त्याची एक कामगार म्हणून स्वतंत्र अस्तित्व, ओळख  म्हणून न दाखवता यंत्राच्या विरोधात तो कसा वागतो हे दाखवनारा यशस्वी चित्रपट आहे. हा चित्रपट वर्गीय कामगारांची  जातीय ओळख नाकारतो आणि  पूर्णतः वर्गीय ओळख आणि संघर्ष दाखवतो. अशाच प्रकारे जात ही एक दुर्लक्ष करण्याची बाब आहे म्हणून त्याचे अस्तित्वच नाकारले गेले जात आहे

याला काही अपवाद आहेत  का?

चित्रपट निर्माते कधीकधी आपला नेहमीचा मार्ग सोडून अस्वस्थता, वादग्रस्तता आणि समाजभान या क्षेत्रांमध्ये  भरकटलेले सुद्धा आढळतात ;पण अशा प्रकारचे अनुभव आणि प्रयत्न करण्यासाठी भारतीय चित्रपट सृष्टीने एका वेगळ्या चित्रपट शाखेला जन्म दिला आहे. ज्याला आपण समांतर चित्रपट म्हणून ओळखतो. मात्र या समांतर चित्रपटांचे पालकत्व  करणाऱ्यांना अपारंपरिक असे  विषय निवडावे लागतात. या चित्रपटांमधून समाजातील  वैगुण्य ,विकृती दाखवण्याचा प्रयत्न वास्तवदर्शी पद्धतीने केला जातो. या परंपरेमध्ये आपण सत्यजित रॉय – सद्गगती ((1981),गौतम घोष -पार (1984),गोविंद निहलानी – आक्रोश(1980), अरुण कौल -दीक्षा (1991),राहुल ढोलकिया – परझानिया(2005), अनुराग कश्यप – ब्लॅक फ्रायडे(2004),दीपा मेहता – अर्थ(1991),नंदिता दास – फिराक(2008), अपर्णाघोष -मी अँड मिसेस अय्यर (2002),श्याम बेनेगल – मंडी(1983), मीरा नायर  यांचा सलाम बॉम्बे इ. चित्रपटांचा समावेश होतो.

समांतर चित्रपट मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट  जात-जमातवाद ,जातीय अत्याचार ,लैंगिक अपमान, जातीय- लैंगिक शोषण आणि वेश्या व्यवसाय इत्यादी विषय दाखवण्याचे टाळतात तेच दाखवतात. या समांतर चित्रपटांच्या कक्षेमध्ये  येणारे चित्रपट निर्माते सुद्धा सामाजिक- सांस्कृतिक दृष्ट्या  उच्चजातीय आणि सुरक्षित  जात वर्गातून येतात. सर्वसामान्य प्रेक्षक जनता यांच्यासाठी हे चित्रपट नसले तरी आणि समाजातून त्याला विरोध होऊ शकतो  हे ज्ञात असून सुद्धा हे चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटातून हे विषय मांडण्याचे , दाखवण्याचे धाडस करतात. या उच्च जातीय चित्रपट निर्मात्यांप्रमाणे हे प्रेक्षक सुद्धा उच्च सामाजिक सांस्कृतिक जातीतील असतात. या प्रेक्षक वर्गाला वंचित वर्गाबद्दल सहानुभूती असली तरी या चित्रपटांकडे ते तिसऱ्या वर्गाचा(Third party) प्रश्न म्हणूनच बघतात . शोषित- वंचित  जातगटातील लोकांना हे चित्रपट स्वतःमध्ये आत्मसात करायला आणि प्रेक्षक म्हणून त्याचा भाग बनण्याची संधी सुद्धा त्यांना मिळत नाही. हे चित्रपट जरी प्रदर्शित झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहवा मिळवली तरी ते येतील खालच्या वर्गाला क्रांतीप्रवण करण्याच्या दृष्टीने कधीही बनवलेले नसतात आणि हे त्या समाजापर्यंत पोहोचतपण नसतात.

यामध्ये  मुख्य सूत्रधार  कोण आहे?

चित्रपट सृष्टी उच्चजात  वर्गाची इंडस्ट्री आहे. या चित्रपटसृष्टीच्या  आणि किती शाखा आहेत याला काही हरकत नाही; पण या  उचभ्रू वर्गाची सांस्कृतिकता पुनर्निर्मित करण्याचा  जाणीवपूर्वक प्रयत्न चित्रपट निर्मात्यांकडून होत असतो.

जरी वंचित वर्गाची कथा समांतर चित्रपट सृष्टीवर अग्रभागी  असली तरी त्याचे प्रतिनिधित्व आणि प्रतिबिंब उच्च जातीय उचभ्रू वर्गाच्या नजरेतून साकारले जाते. मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांनी सोयीस्कर पद्धतीने बहिष्कृत केले गेलेले आणि नाकारला गेलेल्या आशयाला जरी समांतर चित्रपटांनी  दाखवले असले तरी हे दोन्हीही प्रवाह सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या वर्चस्ववादी गटाने नियंत्रित केलेले आहेत. पण हाअवकाश वंचितांसाठी आपली स्वतःची संस्कृती आणि स्वतःचे कथानक चित्रपटांमध्ये  आणण्यासाठी पुरेसा नाहीय. चित्रपट निर्मात्यांचा अघोषित बहिष्कार हा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या भान घडवण्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या अधिक नुकसानकारक   आणि भयावह आहे.

लेखिका नागपूरस्थित असून ती संशोधक आहे.