मराठी अनुवाद – महेश पेडणेकर

सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिमा या अत्यंत महत्त्वाच्या खूणा असतात; ज्या आपल्या आठवणींना मनात कोरुन ठेवण्याचे काम करत असतात. वासाहतिक काळामध्ये भारतामध्ये सार्वजनिक ठिकाणी  अनेक पुतळे उभारण्यात आले. यामागे उद्देश होता तो स्थानिक लोकांवर  आपल्या सत्तेचा प्रभाव गाजवून अंकित करणे आणि नवीन राष्ट्राचा जन्मोत्सव साजरा करणे. मात्र यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बदल करण्यात आला. सार्वजनिक क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये भारतातील अभिजन आणि राज्यकर्त्या वर्गाला अनुकूल होईल अशा पद्धतीने चर्चाविश्वाचे जमातीकरण करण्यात आले. आज जेव्हा आपण हैदराबाद मधील’ हुसेन सागर’ किंवा चेन्नईतील ‘मरिना बीच’वर फेरफटका मारतो तेव्हा त्या प्रतिमा अतिशय ठळकपणाने दिसतात आणि त्या संबंधित प्रदेशाच्या  इतिहासाची एक विशिष्ट दृश्य सांस्कृती आणि कथानके अभिव्यक्त करतात.

ब्राह्मणी सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारताच्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये प्रमुख आधार राहिलेला आहे. भारतातील सार्वजनिक ठिकाणी उभारलेले पुतळे आणि प्रतिमा निर्मितीतून ते पुन्हा पुन्हा सातत्याने प्रतिबिंबित करण्यात आलेले आहे. देशाच्या जवळ जवळ प्रत्येक भागामध्ये सार्वजनिक क्षेत्रात दोनच पुतळे

सर्वव्यापी आहेत-आंबेडकर आणि गांधीजी यांचे. या      दोघांचीही  ऐतिहासिक  वाटचाल खूप वेगळी  राहिलेला आहे. जेव्हा काँग्रेसचे सरकार सार्वजनिक ठिकाणी महात्मा गांधींचे पुतळे उभारण्यामध्ये व्यस्त होते तेव्हा आंबेडकरी जनतेने शा एकेरी प्रक्षेपणाला आणि वसाहतवादी भारतात सुरू असलेल्या ब्राह्मणी सांस्कृतिक राष्ट्रवादाबद्दल विरोध प्रकट केला. या दोन्ही प्रतिमांनी भारताच्या शहरी आणि बिगर शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणे व्यापलेली आहेत. गांधींच्या पुतळ्याचा प्रचार आणि प्रसार हा काँग्रेस सरकारचा स्थापनेशी  निगडित आहे. याचा प्रसार १९५२ च्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त प्रमाणात वाढला होता. हे अत्यंत मनोरंजक गोष्ट आहे की महाराष्ट्रातील शिल्पकार सदाशिव साठे आणि राम सुतार हे तदनंतर महात्मा गांधींचे पुतळे निर्मिती मध्ये गुंतले होते. भारतामध्ये असे अनेक शिल्पकर आहेत ज्यांना काँग्रेस पक्षाने महात्मा गांधींचे पुतळे निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी स्थापित करण्यासाठी राजाश्रय दिला होता. काँग्रेसच्या अनेक खासदारांचा आणि नेत्यांचा ज्यांनी डॉ आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध केला होता त्यांचे देखील पुतळे सार्वजनिक ठिकाणी उभारलेले आढळतात. थोडक्यात राजकीय कारभाराने सातत्याने अशा स्त्री-विरोधी  पुतळ्याना  जनमानसात पुतळे बांधून बिंबवण्याचा प्रयत्न केला होता.

स्थानिक जनतेला खूष करण्यासाठी अशा प्रादेशिक आणि स्थानिक प्रतिमांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी  एक दृश्यता मिळवून देण्यात आली. याउलट महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचा वेगळा इतिहास आहे. आंबेडकर यांचा पुतळा कोल्हापूर मध्ये १९५० मध्ये स्थापित करण्यात आला तेव्हा डॉ आंबेडकर जिवंत होते. हे दोन्ही पुतळे उभारण्याची कल्पना मराठा भाई माधवराव बागल यांची होती. यापैकी बाळा चव्हाण यांना आंबेडकरांचे पुतळे निर्मिती करण्याचे काम देण्यात आले होते तर बाबुराव पेंटर यांना महात्मा फुले यांचे.हे काम खऱ्या अर्थाने एक सार्वजनिक प्रकल्प होता. या दोन्ही पुतळ्यांच्या उभारणीसाठी भाई माधवराव बागल यांनी लोकवर्गणी गोळा करण्याचे काम हाती घेतले होते. बाळा चव्हाण यांच्या नातवाच्या मते आंबेडकरांनी त्यांच्या आजोबांच्या स्टुडिओला दोनदा भेट दिली होती. इतर पुतळ्यांच्या तुलनेत डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यातून प्रतीत होणारे त्यांचे व्यक्तित्व आणि गुणवत्ता अद्वितीय आहे. याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तत्कालीन वातावरण आंबेडकरी राजकारणविरोधी असल्यामुळे  मराठा समाजाने भाई माधवराव बागल यांनी दिलेले योगदान कोणी समजून घेतले नाही. त्यानंतर ब्रम्हेश वाघ यांनी डॉ आंबेडकर यांच्या मूर्तीकलेमध्ये केलेले  उत्क्रांती विलक्षण होती

सुरुवातीला ब्रह्मेश वाघ यांनी बनवलेल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्या मध्ये डावा हात मागे आणि उजव्या हाताचे बोट उभे अशा पोझिशन मध्ये पुतळे बनवले. यामध्ये डॉ आंबेडकरांची जनतेला उद्देशून भाषण करण्याची उभी पोजिशन दर्शविण्यात आली होती. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे ब्रम्हेश वाघ यांनी बनवलेली प्रतिमा बदलण्यात यावी अशी सूचना राजाभाऊ खोब्रागडे( अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ) यांनी केली.राजाभाऊ खोब्रागडे यांनी पुतळ्याच्या रचनात्मक बदलामध्ये  पुढाकार घेतला.

राजाभाऊ यांनी पूर्वीच्या पुतळामध्ये, ज्यामध्ये उजव्या हाताचे बोट उभे आणि डावा हात मागे  आहे अशी पॉझिशन होती त्यामध्ये बदल सुचवून डाव्या हातात संविधान धरलेले असावे असे  सुचवले. डॉ आंबेडकरांची ही प्रतिमा सर्वात जास्त लोकांमध्ये कोरली गेली. डॉ आंबेडकर हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काँग्रेस आणि महात्मा गांधी यांचे टीकाकार राहिल्यामुळे जातीयवादी  हिंदूंनी नेहमी डॉ.आंबेडकर विरोधी भावना जोपासल्या. ज्याचा  परिणाम सातत्याने संघर्ष होण्यामध्ये झाला. प्रतिमांना एक मूर्तीकलात्मक(iconographic) महत्व असते. तरीसुद्धा गांधी आणि इतर हिंदू नेते यांच्या प्रतिमाच केवळ ब्रिटिश विरोधी संघर्षाचे प्रतीके बनवून सार्वजनिक स्थळे व्यापून टाकण्यात आली. आणि खालच्या जातवर्गातील नेत्यांना दुय्यम स्थान देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये डॉ आंबेडकरांचे पुतळे उभारण्यासाठी जागेवरून अनेक वाद झाले. यापैकी बऱ्याच वादाचे नेतृत्व हे सत्ताधारी राजकीय पक्षांच्या कारभारामुळे झाले. ज्यामध्ये आंबेडकरी अनुयायांना सर्व पातळीवर संघर्ष करावा लागला आणि विरोधकांना सामोरे जावे लागले. तसेच सरकारी इतिहासाचे वृत्तान्त असे कथानक पुढे आणतात की’ काँग्रेसनेच राष्ट्र निर्मितीमध्ये आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिले आणि इतरांचे योगदान बेदखल करण्यात आले. या पद्धतीने उच्चजातीय हिंदूंचे जे अंधानुकरण आणि जमातीकरण करण्यात आले त्यामध्ये ही मनोभूमिका कारणीभूत राहिलेली आहे. फुले-आंबेडकर या दोघांच्या प्रतिमांचे प्रक्षेपण  परिवर्तनकेंद्री आणि   वंचितांचे सबलीकरण करणाऱ्या प्रतिमा  म्हणून पुढे आणण्याची एक महत्वाची भूमिका त्यांच्या अनुयायांनी निभावलेली आहे. भारतातील राजकारण सातत्याने आंबेडकर विरोधी आणि आंबेडकरकेंद्री राहिलेले आहे, ज्यामध्ये आंबेडकर हे ‘परिवर्तनवादी’ विचाराचे प्रतिनिधीत्व करतात तर आंबेडकरविरोधी गट आज ‘जैसे थे वादी’ विचाराचे प्रतिनिधित्व करत आले आहेत मग तो कोणत्याही  राजकीय पक्ष असो. त्यामुळे देशातील बहुसंख्य सार्वजनिक स्थळांना या ब्राह्मणी  विचारांनी आकार दिलेला आहे आणि प्रगतशील आणि वैज्ञानिक विवेकवाद रुजवण्यात प्रतिबंध केलेला आहे. रीसुद्धा आज देशातील सार्वजनिक स्थळी डॉ आंबेडकरांचे सर्वाधिक पुतळे उभारलेले आहेत. आणि यापैकी बहुसंख्य पुतळे हे लोकवर्गणीतून निर्माण झालेले आहेत. कोणत्याही राजकीय आश्रय अथवा सत्तेमुळे झालेले नाहीत. मात्र इतरांचे पुतळे सरकारच्या  राजाश्रयामुळे झालेले आहेत.

काळाच्या ओघात वेळोवेळी डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेने  एक परिवर्तनाचे साधन म्हणून प्रगतशील दर्जा प्राप्त केलेले आहे; मात्र गांधींचे प्रतीक ,त्यांची मूल्ये ही स्थितिशील झालेली आहेत. डॉ आंबेडकर यांच्या मते गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी  दिलेल्या 1943 च्या व्याख्यानानुसार त्यांचा प्रवास पुरातन ,पुराणमतवादाच्या दिशेने(return to antiquity) सुरू आहे. डॉ आंबेडकरांच्या अनुयायांना सातत्याने हिंदू जातीय वाद्यांच्या  रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या राजकारणात शह देण्यासाठी केला. या लढणाऱ्या समुदायांच्या जातिनिष्ठांचे  विश्लेषण आपल्याला बातम्यांच्या  मथळ्यांमधून करता येऊ शकते. ज्यामध्ये डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याची  विटंबना,विद्रुपीकरण करणाऱ्या घटनांचा अंतर्भाव आहे. पण एकाही हिंदू नेत्यांच्या  पुतळ्याची विटंबना आजवर आंबेडकरवाद्यांनी केलेली आढळत नाही.

आश्चर्य म्हणजे मोठ्या संख्येने आंबेडकरांचे काँक्रीटचे  पुतळे ग्रामीण भागात बनवलेले पाहायला मिळतात. हे पुतळे हुबेहुब ऐतिहासिक वाटत नाहीत. एक मोठे कपाळ, जाड चष्मा आणि पाश्चात्य कोट परिधान केलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. आपल्याला असे म्हणता येऊ शकते की  20 व्या शतकामध्ये प्रतिमाशास्त्राचे असे प्रमाणीकरण जर  झाले असेल तर ते डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या बाबतीत झाले आहे. प्रतिमाशास्त्रा (मूर्तिकलेमध्ये)संदर्भात आलेली स्पष्टता, सूक्ष्मपणा याबाबत आपल्याला अलिकडे दिसते. जेव्हा आंबेडकरवाद्यांनी    आंबेडकरांच्या  पुतळ्यामध्ये   केलेला बदल विशेष करून त्यांच्या कोटाचा  भगव्या ऐवजी निळा कलर  करण्यात आला; त्यामध्ये बदल करण्यात आला ज्याला यू. पी. मध्ये राजकीय मान्यता होती. इतर कोणत्याही राजकीय प्रतिमेला मग काँग्रेसवादी असो अथवा अन्य पक्ष असो फुले आंबेडकर यांच्या पंथाला जी उंची, दर्जा प्राप्त झाला,तो प्राप्त करता आला नाही. लोकांच्या स्मरणामध्ये इतर जे पुतळे-प्रतिमा आहेत त्या राज्य सरकार पुरस्कृत आहेत आणि त्या कबूतरखाण्याच्या हवाली करण्यात आलेले आहेत हे माहीत आहे. दरम्यान सर्व वंचित समूहाने डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेतून एक राजकीय प्रतिनिधित्व, घटनात्मक  लोकशाही आणि  समान हक्कांचा   संदेश देते.

बामसेफ (BAMSEF)च्या उदयानंतर या समुदायाच्या इतिहासाचे उत्खनन करण्यात आले आणि ते हळूहळू समोर आणण्यात आले. म्हणून बहुसंख्य मानवी हक्क लढ्यातील अनेक व्यक्तिमत्वे आणि जातीविरोधी व्यक्तिमत्वे सार्वजनिक प्रबोधनाच्या लढ्यात जोडली गेली. छ.शिवाजी, छ.शाहू महाराज, पेरियार, कबीर, रविदास  आणि बिरसा मुंडा यांचा समावेश सार्वजनिक चर्चा विश्वामध्ये करण्यात आला. जातीविरोधी लढ्यांतील सामाजिक क्रांतिकारी व्यक्तींचे पुतळे बसवण्याचा पहिला राज्य प्रकल्प १९९५ मध्ये मायावती यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाने लखनौ येथील आंबेडकर स्मारक उद्यानाच्या उभारणीसह साकारला होता. पुढे, बसपाचे संस्थापक कांशीराम यांची प्रतिमा विस्मृतीत गेलेल्या सामाजिक क्रांतिकारकांच्या नक्षत्रात जोडली गेली. त्यांना मान्यवर म्हणून संबोधले जाते – राजकीय चळवळ उभारण्यासाठी त्यांच्या अथक संघर्षाची सतत आठवण म्हणून लोकांद्वारे वर्णन केलेले एक विशेषण. लखनौच्या आंबेडकर मेमोरिअल पार्कच्या बाहेर मायावतींच्या आकृतीची अखेरीस जोडणी केल्याने, व्यापक टीकाटीप्पणी करण्यात आली. यामध्ये एक गोष्ट नमूद करायला पाहिजे ती म्हणजे लखनौ मध्ये ‘आंबेडकर मेमोरिअल पार्क’ आणि नोएडा येथील ‘दलित प्रेरणा स्थळ’ म्हणून जे उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभागामार्फत बांधण्यात आले त्याचा आर्थिक बजेट अत्यंत कमी राहिलेला आहे. तरीसुद्धा देशातील माध्यमांनी लोकांच्या नजरेतून ही वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रकल्पावर टीकेची झोड उठवली होती.

भारतासारख्या देशामध्ये, जिथे बदनामीच्या संस्कृतीचा सार्वजनिक मानसावर  राज्य करते तिथे मंदिरे आणि सार्वजनिक  ठिकाणी फिल्मस्टार आणि राजकारण्यांच्या   प्रतिमा पाहायला मिळाल्या तर त्याबाबत आश्‍चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही. लोकांचा कल सातत्याने अंधानुकरण आणि मिथ्या सांस्कृतिक गोष्टींकडे वळवला जातो. सरदार पटेल यांचा सार्वत्रिक मताधिकार हा मूलभूत अधिकार बनण्यास विरोध होता आणि त्यांनी तो घटनेमध्ये समावेश करण्यास नकार दिला असतानाही(संदर्भ-राजशेखर  यांचे पुस्तक-गांधी आंबेडकर पटेल-भारतीय निवडणूक व्यवस्थेचे निर्माते ) सरदार पटेलांची गमावलेली शक्ती पुन्हा पुनर्निर्मित करण्यासाठी statue of unity नावाचा सरदार पटेलांचा सर्वात  उंच पुतळा उभारणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्य प्रकल्प बनला. सरदार पटेल यांच्या पुतळ्याबाबत खूप गाजावाजा करून पाशवी  राजकीय सत्तेचे प्रदर्शन घडवण्यात आले आणि पारंपरिक मिथकांचे गौरवीकरण करण्यात आले. हे एक ब्राह्मणी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उत्कृष्ट नमुना आहे. विशेष म्हणजे दोन्ही लखनौ येथील डॉक्टर आंबेडकर आणि सरदार पटेल यांचे अहमदाबाद मधील पुतळ्याचे काम राम सुतार याने शिल्पकार म्हणून केले ज्याची नियुक्ती राज्य सरकारद्वारे करण्यात आली होती.

हे एक निरीक्षण राहिलेले आहे की राम सुतार यांच्यासाहित बरेचशे शिल्पकार डॉ आंबेडकरांच्या  प्रतिमेमध्ये शक्तिशाली आशय आणू शकलेले नाहीत. हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.याचे कारण कदाचित आंबेडकरांच्या बाबतीत शिल्पकारांची समज ही ब्राह्मणी सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारलेली आहे. म्हणून त्यामध्ये सापेक्षतेच्या भावनेचा अभाव आढळतो. डॉ आंबेडकर यांच्या अनेक  पुतळ्याचे निरीक्षण प्रो. हेमंत नागदिवे  यांनी केले जेव्हा ते महाराष्ट्र कला संचालनालयाचे संचालक होते. त्यांना आंबेडकरी पुतळ्यांच्या रचनेबद्दल सूचना कराव्या लागलेल्या आहेत त्यांनी नोंदवले आहे की बऱ्याच शिल्पकारांना आंबेडकरांच्या व्यक्तित्वाबद्दल सापेक्षतेची भावना नाही;त्यामुळे केवळ त्यांच्या प्रतिमेमध्ये एक साचेबद्धता आलेली आहे.

प्रो.वाय एस अलोनी, व्हिज्युअल स्टडीज स्कुल ऑफ आर्टस् अँड आस्थेटिक्स जवाहरलाल नेहरू विद्यापीठ न्यू दिल्ली-110067.