मूळ हिंदी कविता : विहाग वैभव

मराठी अनुवाद : विजय चोरमारे

परमेश्वर सेनापतीसारखा आला
न्यायाधीशासारखा आला़
राजासारखा आला
विद्वानासारखा आला
आणखीही वेगवेगळ्या प्रकारे आला परमेश्वर

परंतु जेव्हा यावेळच्या पिकांमध्ये
शेतकऱ्यापुढची आव्हानं
तणासारखी इतकी पसरली की
त्याची जगण्याची इच्छाच मारून टाकली चहुबाजूंनी
आणि त्याचं जिवंत राहणं
एका वीराच्या यशोगाथेसारखं ठरलं
तर अशा परिस्थितीत
परमेश्वरानं शेतकरी होऊन आलं पाहिजे
(मला वाटतं परमेश्वर शेतकरी व्हायला घाबरतो)

तो तुरुंगात
राजमहालात
युद्धात
जसा वारंवार
घेतो अवतार
तसाच त्यानं
यावेळी शेतात घ्यायला पाहिजे अवतार

चार हातांचा तो अवतारी देह
मातीनं असा माखलेला असावा की
घामानं चिकटून ती त्याच्या शरीराचा भाग बनावी
मुश्किलीनं त्याची काळी कातडी
झाकून टाकेल छातीच्या फासळ्या
आणि त्या चार हातांच्या परमेश्वराच्या
एका हातात फरशी
दुसऱ्या हातात कोयता
तिसऱ्यात मूठभर धान्य
आणि चौथ्यामध्ये सावकारानं दिलेली पावती असेल
(किती रोमांचक असेल परमेश्वराला असं पाहणं)работни обувки fw34 steelite lusum s1p 38
normamascellani.it
covorase man
bayern münchen spieler
karl sneakers
addobbi fai da te matrimonio
prestonstadler.com
spoločenské šaty pre moletky
fingateau.com
lifeonthevineministries.com

मला खात्री आहे की सावकारानं दिलेली पावती परमेश्वर
कुठल्या दिव्य ज्ञानाचा स्त्रोत असल्यासारखी वाचणार नाही
तो ती वाचून उदास होईल
त्याला वाटू लागेल की
या देशात परमेश्वर होणं
शेतकरी होण्यापेक्षा अनेक पटींनी सोपं आहे

सृष्टीच्या कुठल्या कोन्यात
खरंच कुठं परमेश्वर असेल
आणि तो आपल्या अस्तित्वाबाबत सजग असेल
तर आता वेळ आली आहे की
त्यानं धान्य पेरलं पाहिजे
कापलं पाहिजे, रडलं पाहिजे
परमेश्वरानं शेतकऱ्यासारखं बनलं पाहिजे

कवी उत्तरप्रदेशातील आघाडीचे कवी असून दलित संवेदना प्रतीत करणारी त्यांची कविता आहे.

या कवितेते अनुवादक मराठीतील ख्यातनाम कवी असून ते पत्रकारही आहेत.