१.

शाश्वती

हरवलेल्या व्यक्तीचा
सैरभैर होत
शोध घ्यायचा
तरी
शोधून सापडलेली व्यक्ती
तीच असेल
पूर्वीची
याची शाश्वती देता येते ?

२.

जपून ठेवल्या आहेत मी

तू येतेस आत अलगद
मनाची मेंदूची दारं घट्ट बंद करून घेतली तरी
फुटतेस आत प्रस्फूट टिपोर चांदण्यासारखी
माझा आसमंत उजळून निघतो सारा
तू दिलेल्या अशा अगणित भेटी
जपून ठेवल्या आहेत मी
पुस्तकातील मोरपिसासारख्या
तू असतेस नेहमी बंद पाकळ्यांसारखी
जणू तुझ्या मनात कसलीच आंदोलने नसतात
तरी तू माझं मन जपण्यासाठी केलेल्या
प्रयत्नांचे अर्थ तुझ्या मौनातून फुटून सर्व सांगत असतात.работни обувки fw34 steelite lusum s1p 38
normamascellani.it
covorase man
bayern münchen spieler
karl sneakers
addobbi fai da te matrimonio
prestonstadler.com
spoločenské šaty pre moletky
fingateau.com
lifeonthevineministries.com

३.

प्रतिमा

एखादी प्रतिमा
एवढी खोलवर मुरलेली असते
मनात
की तिच्याशीच मिळत्या जुळत्या प्रतिमा
आपण शोधत असतो
सर्वत्र

■■

देविदास कळसकर
मु.पो. जवळा, ता. शेगाव, जि. बुलडाणा – ४४४ २०३
मो. नं. +918432420741