गोव्यातील ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते, लेखक चंद्रकांत जाधव यांचे ” ढगाआडचा चंद्र ” हे आत्मकथन दीर्घ प्रतिक्षेनंतर वाचक,अभ्यासक व कार्यकर्ते यांना उपलब्द झाले आहे. मनोविकास प्रकाशनने या आत्मकथनाची दुसरी आवृत्ती बाजारात आणली आहे. जनवादी साहित्य संस्कृती चळवळ, महाराष्ट्र आणि मनोविकास प्रकाशनाच्यावतीने गेल्या आठवड्यात ( २० नोव्हेंबर ) सावंतवाडीत या    दुस-या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले आहे.gartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

१.

गोव्यातील काही मोजक्याच लेखकांकडून दलित साहित्याच्या अनुषंगाने लेखन केले जाते. आवश्यकतेनुसार दलित लेखकांची संस्कृती विकसित झालेली नाही. दादू मांद्रेकर गोव्यातील आघाडीचे बंडखोर साहित्यिक. दादूचा ‘शापित सूर्य’ हा पहिला कविता संग्रह पहिल्यांदा प्रकाशित झाला हे वाचनात येते. चंद्रकांत जाधव यांच्या ढगाआडचा चंद्र ह्या आत्मकथनाचे प्रथम प्रकाशन १९९६ मध्ये झाले. गोव्यातील दलित साहित्यातले पहिले स्वकथन. दादू मांद्रेकरानी याच दरम्यान विपूल लेखन केले होते. दादूंनी नंतर सहा पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. त्यांनी कविता, कांदबरी, वैचारिक साहित्य आणि अन्य विपुल लेखन केलेले आहे. त्यांचे काही लेखन अजूनही अप्रकाशित आहे. डॉक्टर महेश पेडणेकर यांनी दादू मांद्रेकर यांचे चरित्र हल्लीच प्रकाशित केले आहे. अन्य काही लेखकांनी आंबेडकरी चळवळीला अनुसरून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु विशेषतः दखल घेण्यासारखे नाही. शिवाय दलित साहित्याच्या मापदंडात मोजण्याइतपत मुबलक उपलब्धही नाही. दखल घेण्याइतकी साहित्याची निर्मिती झालेली वाचनात नाही. वीस वर्षांनी पुन्हा दुसरी आवृत्ती ढगाआडचा चंद्र प्रकाशित होत आहे. त्यामुळे नव्या लेखकांना नवी प्रेरणा हे आत्मकथन ठरू शकते.

डावीकडून संपत देसाई, अरविंद पाटकर, महावीर जोंधळे, प्रवीण बांदेकर, रमेश गावस, चंद्रकांत जाधव आणि मीराताई

महाराष्ट्राच्या दलित साहित्यात १९९१ च्या आसपास एका तपामध्ये आंबेडकरवादी स्वकथनाची चळवळ वादळे निर्माण करीत होती. मराठी साहित्य आणि दलित साहित्याला उच्च शिखरावर नेऊन सोडणारी अनेक दलित स्वकथने त्या काळात प्रकाशित होत होती. चंद्रकांत जाधव यांच्या स्वकथनाचा काळही त्या तपाच्या अलीकडचा आहे. दलित साहित्यात अनेक स्वकथनांनी तेका सुरंग लावला होता. सुरुवातीला प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ या स्वकथनाने दलित स्वकथनांची सुरुवात झाली . त्यानंतर दया पवारांचे, ‘बलुतं’, लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’, जाती व्यवस्थेमुळे जगणे होरपळलेले  जीवनाची मरणगाथा, शंकरराव खराताचे’ ‘तराळ अंतराळ’, वसंत मुन यांचे  ‘ वस्ती’ बाबाराव मडावी’ ‘ ‘आकांत’, रामराव अनिरुद्ध झुंजारेचे ‘ झुंज’, आत्माराम राठोड यांचे ‘ तांडा’, किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्हाट्याचे पोर’, मोतीराव जाधव यांचे ‘ भटक्या’, गौतम कावळे यांचे ‘बावळट’, बाळासाहेब गायकवाड यांचे ‘ख्रिस्ती महार’, इब्राहिम खान यांचे ‘ मुस्लिम महार’ इत्यादींच्या स्वकथनांनी संपूर्ण मराठी साहित्यात तसेच दलित साहित्यात विदोहांची वादळे निर्माण केली होती .

२.

चंद्रकांत जाधव वेंगुर्ल्यात टेलर म्हणून काम करीत असताना वाचायला शिकले. शाळेची पाटी फुटली असली तरी त्यांची शिकण्याची जिज्ञासा आणि इच्छाशक्ती मेली नव्हती. शाळेत गेला नसला तरी अक्षर ओळख करून घेण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकले नाही. लेखक राखोबा मास्तर सातार्ड्यात शाळा शिक्षक होते. त्यामुळे ते परिचयाचे होते. लेखक त्यांच्याकडून वाचन करण्याची प्रेरणा घेतात. सुरुवातीस तुटक तुटक वाचत असले तरी त्यांची समजून घेण्याची प्रकिया आणि बुद्धी अतिशय तल्लक आहे. चंद्रकांत जाधव मास्तरांकडून आंबेडकरी चळवळ समजून घेण्याचे प्रशिक्षण घेतात. पणजीत आल्यावर त्यांचे आंबेडकरी चळवळीचे दुसरे गुरु भीमराव माटे भेटतात. त्यांना चळवळ समजून घेण्यासाठी पुस्तके वाचण्याचे खुराक पुरवीतात. सुरुवातीस अपटप करून वाचणारा हा गुराखी खमके पुस्तके वाचायला शिकतो. पुस्तक वाचून झाल्यावर भीमराव माटे त्यानी वाचलेल्या पुस्तकावर उजळणी घेत असत. त्यामुळे वाचलेले लक्षात ठेवायचा प्रयास लेखकांनी चांगला केला होता. अशा तऱ्हेने त्यांच्या हातात बलुतं, उचल्या ई. काही स्वकथने येतात. ही स्वकथने वाचून झाल्यावर आपण भोगलेले अनुभव, माझं राखणेपणा म्हणून झालेले शोषण कुठच्याही स्वकथनात सापडत नाही. आपण भोगलेले, शोषलेले अनुभव एक चांगलं स्वकथन होईल आणि आंबेडकरी साहित्यात भर पडेल. आंबेडकरी चळवळीमुळे एखादा अनपढ अशिक्षित धैर्याने उभा राहून समतावादी आंबेडकरी चळवळीची धुरा खांद्यावर झेलायचे सामर्थ्य ठेवू शकतो या उद्देशाने स्वकथन लिहीले गेले.  ढगाआडचा चंद्र या पुस्तकात त्याने दाखवून दिले आहे. त्यांच्या या पुस्तकांनी गोव्यातील दलित साहित्यातच नव्हे तर मराठी साहित्यालाही समृद्ध केले आहे.

ढगाआडचा चंद्र, हे स्वकथन वाचल्यावर मन हेलावून सोडते. मन विषण्ण बनने. पुस्तक वाचून झाल्यावर मन उदासीन अस्वस्थ होते.

डॉक्टर यशवंत मनोहर हे आंबेडकरी विचारांचे तत्त्वचिंतक, तत्त्वज्ञानी आहे. त्यानी आपल्या आंबेडकरवादी मराठी साहित्य संशोधन या संशोधनपर ग्रंथात आंबेडकरी . आत्मकथन, आत्मकथा, आत्मचरित्र यांना स्वकथन हा तात्विक शब्द संबोधला आहे. ते म्हणतात की आंबेडकरी साहित्याला ‘आत्म’ -कथा, चरित्र, कथन म्हणणे उचित म्हणता येत नाही. स्वकथनाच्या बाबत ते एक तात्विक मांडणी करतात म्हणतात “आंबेडकरी प्रेरणा धम्मस्वीकाराच्या मुशीतून आणि त्याच्या नास्तिकतेच्या कुशीतून अपराजित पंखांना झेपाऊन आलेली प्रेरणा आहे. आत्मकथा आत्मचरित्र किंवा आत्मकथन या शब्दांमध्ये येणाऱ्या आत्मा हा शब्दा सोबत कर्मकांड आणि लाजिरवाणे व खोटेपणाचा सिद्धांताचे स्वरूप समोर आणते. वर्ण, जातीपाती गरिबी – श्रीमंती ,अस्पृश्यता इत्यादी सर्व शोषणाचा भाग आत्मा या शब्दात गर्भित आहे . दलित लेखक ह्या खुळचट परंपरांना नाकारतो आणि सर्वावर मात करतो. आंबेडकरी विचारानी बंड करतो. म्हणून लेखकाच्या आत्मचरित्राला स्वकथन ही संज्ञा देणे मला यथायोग्य वाटते.”

ढगाआडचा चंद्र ह्या स्वकथनाच्या लेखकाचा जीवनपट समाजाच्या तळाशी असलेल्या जातीसंबंधाशी आहे. महार जातीत जन्मल्यामुळे जिथे जिथे राखणा म्हणून कामाला गेले तिथे तिथे त्याचे जातीयतेमुळे शोषण झाले आहे. बालपणात राखणा म्हणून सोसावे लागलेले भोग भोगावे लागले. अमानुषपणे बेदम काठ्यांचा मार, त्यांचावर  झालेले मोठा आघात आहे. त्यांच्यावर झालेले

३.

आघात, , अत्याचार, छळ, जाच संविधांच्या बाल हक्क नियमानुसार गुन्हेगारी सिद्ध होऊ शकते . लेखक आपण महार, खालच्या जातीचा ,भुकेने कंगाल, पोट भरण्यासाठी मुकाट्याने हे सर्व सहन करतो. यातून सुटका करवून घेण्याचा विचार येतो, पळून जावे असे कित्येकदा  वाटते तर घरी आईच्या माराची भिती आणि उपासी राहण्याची पाळी येईल ह्या विचारांमुळे कुचंबाणा हा त्याचा जीवनातला एक भंयकर कोंडमारा आहे कथनात दिसतो.

       विद्येविना मती गेली| मतीविना नीती गेली |

       नीतिविना गती गेली| गतीविना वित्त गेले |

       वित्तविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले|

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या क्रांतिकारी सामाजिक चिंतनात “ढगाआडचा चंद्र” चे स्वकथन घुटमळताना दिसते. अज्ञानामुळे जातीयता, अस्पृश्यता त्याचे भोग लेखकाने सोसावे, भुकेसाठी दीड दमडीचा रोजगार बाल वयातली सर्व वर्षे लोकांच्या ओसरीवर कावरेबावरे होऊन घालावी लागतात. हे सर्व अस हमीच भोग समाजातील जातीय परंपरा, रूढी रितीरीवाज, अंधश्रद्धा  अज्ञानताच्या मुळासी आहे. महार समाज त्याचा बळी जातो. लेखक या सामाजिक परिस्थितीचे प्रतिनिधिक स्वरूपाचे घटक आहेत.

स्वकथनाच्या सुरुवातीस “पाटी फुटली शाळा सुटली” ह्या प्रकरणात शिक्षणाची उमेद धुळीला मिळवणाऱ्या आईचे कथन केले आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेला हा लेखक गुराखीपणाचा श्रीगणेशा गिरवतो. गुरांची शाळा गोव्यातील थीवी ह्या गावापासून सुरू होते. सातार्डा गाव सोडून प्रथमच हा सहा- सात वर्षाचा बालक पाच रुपयाच्या गुराखी या रोजगाराला जातो. त्यांच्या आईला त्याने ही गुलामी करावी असे वाटते. घरात अठराविश्वे दारिद्र्य. आई-वडील आणि मोठा भाऊ काम करतो. तरीही घरात उपवासाची मारामारी. दोघातिघांच्या मजुरीतून संसाराला बळकटी नाही. म्हणून आईला लेखकाने शिक्षणापेक्षा गुलामी, मजुरी (राखणेपण) करावे असे वाटते. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास महार समाजाला दिली जाणारी मजुरी म्हणजे शोषण आहे. घरातली दोन-तीन माणसे कमावती असूनही उपास काढावे लागतात हे विदारक विषमतेचे अर्थकरण मांडले आहे. हे शोषणाचे चित्र उभे करताना कुठेही बंडखोरी किंवा विद्रोह केलेला दिसत नाही. जे भोग भोगले अनुभवले ते वास्तव रूपाने मांडले. अस्पृश्याना धनसंचय करण्याचा कोणताही अधिकार नाही. पोटभर जेवणा इतकीही मजूरी मिळू न देण्याची तजवीज गावातील सर्व समाजाकडून काळजी घेतली जाते. हे ह्या स्वकथनातून स्पष्ठ होते.

चंद्रकांत जाधवाच्या जीवनात त्याच्या घरातील पालोपखी म्हणजे भयंकर मोठी समस्या होय. आजोबानी विधवा बाईशी लग्न केलेले आजच्या परिस्थितीत  लेखकाला प्रागतिक विचार वाटला तरी त्याच्या वैयक्तीक जीवनावर भंयकर दहशत बसली होती. त्यामुळे त्याची लहान भांवडे मेली असा वाड्यावरील लोकाचा गैरसमज होता. त्याकारणाने वाड्यावरील लोकही त्याना छळत होते. रानात गुराकडून छळ, मालकाच्या घरी माराचा भय तर वाड्यावर पालोपखी वरून आपेष्ठाचा जाच आशा त्रीवेणी घोर समस्याना बालपण खचून गेलेले वाटते.

४.

लेखक थीवीला पहिन्यांदाच राखणा म्हणून जातो. रात्रीच्या वेळी त्याला व्हरांडयात एकटा झोपण्याचा प्रसंग मनाला हेलावून सोडतो. नेहमी वडिलांच्या कुशीत बाबाच्या पोटावर हात टाकून निवांत झोपणारा हा बालक अस्वस्थ बेचन होतो. बालमन भित्रे असते. समज न आलेला बालक व्हरांड्यात एकटा झोपताना गांगरून जातो. संपूर्ण रात्रभर झोप लागत नाही. एक ना अनेक विचार मनात येतात. भुताच्या  भितीने रात्रभर तळमळतो. दरदरून घामाघूम होतो. काळीज धडधडायला लागते. हे विदारक कथन अंगावर काटा काढतो. अस्पृश्यतेची वागणूक भयंकर असते. थीवीला सकाळी उठून तोंड वगैरे धुतल्यावर चहा दिला जातो. लहान वयाताला हा त्यांचा पहिला अनुभव. पेल्यात चहा वरून ओतणे , भाकरी दुरुनच फेकून देणे , पाणी पिण्यासाठी वरून ओतणे. ओंजळीने पाणी घेऊन पिणे, जेवण झाल्यावर व्हरांड्यात जेवलेल्या जागेवर शेण सारवून साफ करूणे,  त्याचे सर्व मुस्ताकी म्हणजे कपडे व्हरांड्याच्या पायरीखाली खाचीला ठेवणे… अस्पृश्यासाठी ही वागणूक लेखकाला सगळ्या मालकांच्या घरी अनुभवायला येते. जातीयतेच्या अज्ञानी व्यवहारामुळे लेखकाचे शोषण होत होते.  लेखक ह्या सामाजिक परिस्थितीचा बळी बनला आहे. राखणेपणा ही अस्पृश्यतेची दुसरी परिभाषा आहे.

लेखक चंद्रकांत जाधव

बारा तेरा वर्षाचा हा कालावधी राखणेपणा करण्यात गेला. बालपणा पासून किशोर वयापर्यत लेखकाच्या बालमनाचे खच्चीकरण झालेले दिसते. अस्पृश्यांना कोणी वाली नसतो. ते कितीही जेष्ठ असो की श्रेष्ठ असो. सवर्णाच्या सर्व व्यक्तीना आळुन पाळुन बोलावे लागे. आई सोबत गावत वाडी मागायाला जाताना लेखकाले हे अनुभव अपमान दर्शविणारे आहेत. 

मालकाचा छोटा मुलगा बारीक बारीक कारणावरून अमानुषपणे बदडतो. एवढासा मालकाचा पोर शीरी लेखकाला अमानुषतेने बडवताना त्याच्या मनाला कुणाचही भिती वाटत नाही. बेदम काठ्याने मारताना अगदी आपाल्या बापालाही जुमानत नाही. लेखकाच्या वाट्याला आलेले हे भोग केवळ  अस्पृश्यतेच्या वाईट चालीरीतीचे मुळआहेत. हा मुर्दाड शिरी अमानुषपणे काट्याने झोडतो . तर किनळेच्या दुसन्या मालकाचा मुलगा शिरी प्रेमळ आहे. आपल्या घरातील दुकानातले लाडू, बिस्कीट, चॉकलेट चोरून आणून लेखकाला देतो. इथ बालमनाच्या कोपऱ्यात कधी जातही भावना नसते. त्यांच्या घरातून सर्विस सोडताना लेखकाचे डोळे दुःखाने दबदबून येतात. चंद्रकांत येथे कनवाळू बनतो. बाकीच्या मालकाच्या घरातील माणसाकडून मार खाणारा हा राखणा शिरीच्या घराचे राखणेपण सोडताना गलबलून जातो. चंद्रकांतचे शेवटचे राखणेपण त्यांच्याच गावातील जिथे त्याच्या भावाने राखणेपण केले होते तिथे. ह्या घरातील धणीन आणि मालक चांगले होते. केवळ जेवण बाहेर वाढायचे . चंद्रकांतच्या जीवनात बदल आणि परिवर्तनाकडे जाणाऱ्या काही घटना इथे घडल्या . राघोबा दादाचे स्वप्न घराला घरपण आणायचे, संसार चांगला करायचे याची स्वप्नही प्रत्यक्षात येण्यासाठी इथल्या मालकांनी आणि मालकिणीने मदत केली. घराची भिंत , दार, बाक इत्यादी वस्तू त्याच्या कमाईतून खरेदी करून दिल्या.  विशेष म्हणजे शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण आणि विश्वास ह्याच घरात रुजवला गेला. त्यातूनच एक गुराखी टेलर बनला आणि टेलरिंग करता करता एक चांगला आंबेडकरी वक्ता , कार्यकर्ता,  पुढारी बनला . त्यामुळे ते गावातील वाईट चालीरीती परंपरा अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करू लागले. ह्या बंडात त्याची पूर्ववैमनस्याची भावना कुठेही दिसत नाही.

५.

तत्कालीन दलित स्वकथनापेक्षा आपल्या राखणेपणाच्या जीवनाचा पट इतरांपेक्षा निराळा आहे त्यामुळे ते लिहिते झाले. हे कथन एका गुराख्याचे आहे. न शिकलेल्या एका आंबेडकरी युवकाचे आहे. लेखकाने भोगलेले गुराखीपणातील  वळ लेखक विसरू शकला नाही. त्यांनी ते शब्दबद्ध केले. त्यातूनच ‘ढगाआडचा चंद्र’ हे स्वकथन जन्माला आले. गुराखी ते टेलर पर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. जिथे माणसाचा विटाळ होतो तिथे एका अस्पृश्य माणसाकडून कपडे कोण शिवून घेणार? या प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना लेखकाला अनेक साहसांना सामोरे जावे लागले. गावातील दुकान आणि पणजीसारख्या शहरात टेलरिंगमध्ये प्रसिद्ध होण्यामागील प्रेरणा बुद्ध फुले आंबेडकर विचारांची क्रांती असू शकते. ढगाआडचा चंद्र मधील एक गुराखी आपल्या जीवनात यशस्वी होतो, ही किमयाच काही वेगळी आहे. अर्थात लेखकाचे कष्ट, पराकाष्टा, सहनशीलता आणि एकाग्रता फार मोलाच्या आहेत. ह्या उत्तुंग असामान्य व्यक्तीचा उत्तरोत्तर विकास होत जावो ही सदिच्छा.

लेखक गोव्यातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते व साहित्याचे अभ्यासकही आहेत.