राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातून १२० किमी चा प्रवास करुन २३ नोव्हेंबरला मध्यप्रदेश मध्ये दाखल झाली आहे. हिंदी पट्ट्यातील हे पहिले राज्य आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या मार्गातील भाजपची सत्ता असलेले कर्नाटक नंतरचे हे दुसरे राज्य आहे. ७ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली होती. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या विदर्भ पट्ट्यातून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने प्रवास केला. महाराष्ट्रात राहुलच्या या यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. आता खरी कसोटी आहे जेव्हा या यात्रेचे प्रवास हिंदी पट्ट्यातून प्रवास सुरु झाला आहे.

राहुल गांधी यांची ही भारत जोडो पदयात्रा भारताचे दक्षिण टोकाकडून निघाली असून उत्तरेत काश्मिरपर्यंत असणार आहे. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला प्रारंभ झाला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंद्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान,हरयाणा, उत्तर प्रदेश,दिल्ली,पंजाब या १२ राज्यातून प्रवास करुन ही पदयात्रा   श्रीनगरला पोहचणार आहे.१५० दिवसात  ३५७० किमीचा प्रवास करुन यात्रा श्रीनगरला पोहचून संपणार आहे.gartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल होताना जवळपास १८०० किमीचे अंतर यात्रेने पार केले आहे. आतापर्यंत जळपास निम्मे अंतर पार केले आहे.

भारत जोडो यात्रा-भय, विद्वेष, हिंसा, बेरोजगारी आणि महागाईविरुद्ध एल्गार

२०१४ साली भाजप देशात सत्तारुड झाल्यानंतर धार्मिक उन्मादाला अभूतपूर्व उधाण आले आहे. मुस्लिमांना लक्ष्य करुन त्यांच्यावर हिंसक हल्ले सातत्याने होत आहेत. एनआरसी, सीएए कायदा आणून अल्पसंख्यांकांना दुय्यम नागरिकत्व स्विकारण्यास भाग पाडणारे कुटील राजकारण खेळले जात आहे. दलित आदिवासींच्या हक्कांसाठी लढणा-या विचारवंताना अर्बन नक्षलवादी ठरवून तुरुगात डांबले गेले आहे. सत्तेला सवाल करणा-यांना, सरकारच्या धोरणांना विरोध करणा-यांना राष्ठ्रद्रोही ठरवून युएपीए सारख्या कायद्याखाली गडजाआड केले जात आहे. घटनात्मक संस्थांची स्वायत्तता खतम करुन बटीक बनवले गेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग विकले जात आहे.बेरोजगारीचा दराची वाढ बयावह पातळीवर गेली आहे. सर्वसामान्य जनतेची कष्टाची दररोजची कमाई महागाईच्या वणव्यात कापरासारखी उडून जात आहे. लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाचा असणारा घटनात्मक विरोधी पक्ष नेस्तनाबूत केला जात आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा या पार्श्वभूमीवर होत आहे. किंबहुना भय,विद्वेष,हिंसा,बेरोजगारी आणि महागाईविरोधात ही यात्रा काढण्यात आली आहे. कन्याकुमारी येथून पदयात्रा सुरु करताना राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रीपेरुंबदुर, स्मृती स्थळ येथे आदरांजली वाहिली. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल यांनी ट्विट केले की, द्वेष आणि फाळणीच्या राजकारणामुळे मी माझे वडील गमावले आहेत, पण आता मी माझा देश यामुळे गमावणार नाही. राहुल गांधी पदयात्रेत याच मुद्द्यावर जनतेशी संवाद साधत आहेत.

भारतातील लोकसंवादाच्या पदयात्रा आणि भारत जोडो यात्रा

राहुल गांधी यांची  ‘भारत जोडो यात्रा’ ही भारतातली पहिली पदयात्रा नाही. याआधीही भारतीय जनतेने अशा पदयात्रांचा अनुभव घेतलाच नाही तर त्यांना त्या त्या पातळीवर यथायोग्य प्रतिसादही दिला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये आधुनिक पदयात्रेची पायाभरणी केली होती. मिठावरील ब्रिटिश कराच्या निषेधार्थ त्यांनी ३८८ किमीची दांडी पदयात्रा केली. या पदयात्रेने सुरु झालेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीने ब्रिटीश साम्राज्यावर कठोर प्रहार केला होता.

तरुण तुर्क म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९८३ मध्ये पदयात्रा काढली होती. चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते दिल्ली या प्रवासाला ‘भारत यात्रा’ असे नाव दिले आहे.  देशातील जनतेला भेटणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे, हे त्यांच्या या पदयात्रेचे एकमेव उद्दिष्ट होते. या यात्रेने चार हजार किमीपेक्षा जास्त प्रवास केला होता. ६ जानेवारी १९८३ रोजी कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकापासून सुरू झालेला हा प्रवास २५ जून १९८४ रोजी दिल्लीतील राजघाटावर संपला. चंद्रशेखर यांना या भेटीचा तात्कालिक राजकीय लाभ मिळाला नाही, पण १९९० मध्ये ते देशाचे ८ वे पंतप्रधान म्हणून निवडून आले. 

१९९३ मध्ये आंध्र प्रदेशचे नेते वायएस राजशेखर रेड्डी यांनी दोन महिन्यांची पदयात्रा सुरू केली. त्यांच्या १५०० किमीच्या प्रवासात  ११ जिल्ह्यांना भेट दिली. या भेटीचा फायदा त्यांना २००४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाला. त्यांनी मे २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वायएस रेड्डी यांच्या पदयात्रेमुळे चंद्राबाबू नायडू यांनी २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावली होती. तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू यांनी २०१३ मध्ये १७०० किमी लांबीची पदयात्रा केली होती. नायडू यांनी २०१४ साली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. वडील वायएसआर यांच्या पावलावर पाऊल ठेवत जगन मोहन यांनीही ३,६४८ किमीची पदयात्रा काढली. ही पदयात्रा ३४१ दिवसांत पूर्ण झाली. जगनने नोव्हेंबर २०१७ मध्ये कुड्डापाह जिल्ह्यातील त्याच्या वडिलांच्या मूळ गावातून प्रवास सुरू केला. यादरम्यान जगनने सुमारे २ कोटी लोकांशी संपर्क साधला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी १७५ पैकी  १५१ जागा जिंकल्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये ७ महिन्यांची नर्मदा यात्रा सुरू केली. यावेळी त्यांनी राज्यातील ११० विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, दिग्विजय यांनी त्यांच्या या प्रवासाचे वर्णन ‘धार्मिक यात्रा’ असे केले होते.

महात्मा गांधी व चंद्रशेखर यांच्या पदयात्रा राष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करणा-या राहिल्या आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्राही राष्ट्रीय राजकारण प्रभावित करणारी राहिल असे आज तरी दिसते. दक्षिण भारत आणि आता महाराष्ट्रात या यात्रेला ज्या त-हेने जनतेचा प्रतिसाद मिळत आहे ते पाहता असे आकलन धाडसाचे ठरणार नाही.

जमिनीशी तुटलेली कॉंग्रेस आणि ‘भारत जोडो’साठी निघालेला एक गांधी

पदयात्रे दरम्यान जयराम रमेश यांनी एका पत्रकार परिषदेत या यात्रेचे कॉंग्रेसच्यादृष्ठीने काय महत्त्व आहे हे स्पष्टच सांगितले आहे. “सत्तेत असताना काँग्रेसचा जनसंपर्क तुटला होता. आम्ही आता या यात्रेच्या माध्यमातून ते पुन्हा शोधत आहोत” असे जयराम रमेश म्हणाले होते. जयराम रमेश यांनी दिलेली कबुली प्रामाणिक आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात जवळपास ६५ वर्षाचा काळ हा कॉंग्रेसच्या सत्तेचा काळ राहिला आहे. यातला सुरुवातीचा काळ हा स्वतंत्र भारताच्या उभारीचा काळ होता ज्यात कांग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली हे निश्चित. मात्र त्यानंतर कॉंग्रेसची धोरणे जनतेची विश्वासघात करणारी राहिली. ९० नंतर आलेल्या खुल्या आर्थिक धोरणांनी कॉंग्रेसला कार्पोरेटकेंद्री राजकारणाचा गुलाम बनवले. कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या शवावर भांडवलबाज अर्थव्यवस्था उभी राहण्याची प्रक्रिया सुरु झाली ती कॉंग्रेसच्या काळात जिला भाजपने आज घोड्याचा वेग दिला आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील पुण्याई आणि गांधी घराण्याचे नेतृत्व याचा माज आणि धुंदीत कॉंग्रेसचे राज्याराज्यांतील सुभेदार वागत आले. कॉंग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्याऐवजी या संस्थानिकांना मुजोर बनण्याची मोकळीक दिली. विचारधारा आणि पक्षशिस्त मागे पडली म्हणण्यापेक्षा ती कधीच नव्हती. केवळ गांधी घराण्याशी निष्ठा हेच कॉंग्रेसच्या सरंजामदारी राजकारणाचे सूत्र बनले. ही किळसवाणी निष्ठा दाखवण्याची मग स्पर्धाच सुरु झाली जिला आजही अंत नाही.

कॉंग्रेसचे जात आणि वर्गचारित्र्य कायम उच्चजातकेंद्री राहिले आहे. त्यातून सुटका करुन घेण्याची इच्छा कोणत्याच नेतृत्वाला वाटली नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाने लोकशाही व्यवस्थेचा स्विकार केला असला तरी कांग्रेस रुढ अर्थाने कधीच लोकशाहीवादी राहिली नाही. त्यातून कॉंग्रेसकडून दोन प्रमाद घडले. एक, भारतीय राजकारणात वंचितांचे राजकारण करु पाहणारे जे फोर्सेस उभे राहिले त्याला आपल्या बहुस्तरसत्ताक राजनीतीने गिळंकृत केले दुसरीकडे उजव्या राजकीय शक्तींना कॉंग्रेस ताकद पुरवत राहिली जी आज तिच्या मुळावर आली आहे.

कॉंग्रेस तिच्या धोरण व नीतींमुळे कमालीची विरोधग्रस्त बनली त्यातून तिचे पतन होणे अपरिहार्यच होते. कॉंग्रेस आणि जनता यांच्या दरम्यान कॉंग्रेसनेच पोसलेल्या सरंजामी सुभेदारांनी पक्ष आणि जनता यांच्या जी खाई निर्माण केली त्या दरीत कॉंग्रेस पक्षच कोसळू शकत होता.तशी ती कोसळलीच. लोकशाही व्यवस्थेत जनतेला निवडीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र पक्षाला एकच पर्याय जनता हाच असतो.

कांग्रेसच्या कमाल नैतिक पतनाने पक्षाचा पारंपरिक जनाधार इतका भूसभूशीत बनला होता की २०१४ च्या निवडणूकीत भाजपने कॉंग्रेसच्या बुडाखालचे सत्तेचे जाजम खेचताच कॉंग्रेसची सत्ताच केवळ धडाम झाली नाही तर पक्षही गाळात गेला. कांग्रेसच्या सरंजामी पुढा-यांनी रातोरात पक्ष बदलला. इंदिरा गांधींसारखी करिष्मा नसलेल्या गांधी घराण्यातीलच नेतृत्वाची हतबलता अधिक तीव्र पणे समोर आली.

ज्या भाजपने धार्मिक राजकारणाचा प्रच्छन्न आधार घेत सत्तेचा राजशकट ताब्यात घेतला त्या भाजपकडे पोलादी पक्षसंघटना आहे. बहुसंख्यांकांचे धार्मिक ध्रुवीकरण करीत कॉंग्रेसच्या पारंपरिक जनधारात सर्वदूर विस्तार करण्यात यशस्वी झालेल्या रास्वसंघाने कॉंग्रेसच्या नाकाखाली काम करीत भाजपसाठी भूमी तयार केली. आज या दोन्हींचा मुकाबला करण्याइतकीही ताकद कॉंग्रेसकडे उरली नाही.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रतिसाद का मिळत आहे?

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उत्तर भारतात पोहचली आहे. जवळपासपास निम्मे अंतर या यात्रेने कापले आहे. मात्र ही यात्रेची दखल माध्यमांनी ज्या त-हेने घ्यायला हवी तशी माध्यमांचा मुक्य प्रवाह दखल घ्यायला तयार नाही. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीया या यात्रेची दखल न घेण्याची दोन कारणे आहेत. एकतर सर्वच माध्यमे गोदी मिडीया बनली आहेत दुसरे कारण म्हणजे याच माध्यमांनी राहुलची प्रतिमा ज्या त-हेने बनवली होती तिला उध्वस्त करीत दक्षिणेतील जनतेने राहुलच्या या यात्रेचे मनापासून स्वागत केले आहे. भारत जोडो यात्रेला ज्या त-हेने प्रतिसाद सर्व थरातील जनता देत आहे ते समजण्याची औकात भारतीय प्रसारमाध्यमे हरवून बसली आहेत. एकंदरीत गोदी मिडीया भांबावून गेला आहे.

मुख्य प्रवाहातील माध्यमांनी अघोषित बहिष्कार पुकारुनही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. दररोज दोन सत्रामध्ये २५ किमीचा प्रवास पदयात्रेचा असतो. या यात्रेत राहुल जनतेशी संवाद साधत निघाला आहे. जो जनतेशी थेट बोलतो आहे. तो मिडीयाशी थेट बोलतो आहे.तो मुलांशी बोलतो आहे. तो जाएसटी, नोटबंदीने कंबरडे मोडलेल्या मध्यम व छोट्या व्यावसायिकांशी बोलतो आहे. तो किमान कौशल्य प्राप्त बेरोजगारांशी संवाद साधतो आहे. तो शेतीच्या अरिष्टाबद्दल बोलतो आहे. तो महागाईबद्दल स्त्रियांशी आपुलकीने बोलतो आहे. तो धार्मिक विद्वेषाबद्दल बोलतो आहे.तो भाजपच्या विद्वेषी धार्मिक राजकारणबद्दल बोलत आहे. तो आरएसएस च्या कुटील राडजनीतीबद्दल निर्भयपणे बोलत आहे.  राहुलचे हा संवाद मोदी सरकारच्या धोरणांनी त्रस्त जनतेला अपील होत आहे. सोशल मिडीयावर जे फोटो प्रसारीत होत आहेत ते पाहता राहुलमधला पोक्त राजकारणी, भाऊ,मित्र,मुलगा असा सर्वच रुपात तो जनतेवर गारुड करताना दिसत आहे. राहुलचे हे रुप गोदी मिडीयाने २००४ नंतर रंगवलेल्या प्रतिमेपेक्षा विपरित आहे आणि तेच खरे आणि अस्सल आहे. भारत जोडो यात्रेने राहुलची खरीखुरी प्रतिमा पुढे आणण्याचे काम करीत आहे. राहुलने महाराष्ट्राची यात्रा अखेरच्या टप्प्यात असताना सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा ज्या त-हेने उपस्थित केला ते पाहता राहुलने ही यात्रा सत्ताकेंद्री न बनवण्यात जी हुशारी दाखवली आहे त्याने भाजपही गोंधळून गेला आहे. भाजपने यात्रेच्या पहिल्याच आठवड्यात स्वामी विवेकानंदाच्या मुद्द्यावरुन घेरण्याच्या प्रयत्न जरुर केला पण ती तोंडघशी पडली. त्यानंतर भाजप यात्रबाबत मौन बाळगून आहे. यावेळी कॉंग्रेसने आपली सोशल मिडीयाची फौज अधिक मजबूतीने कार्यरत केली आहे.

राहुलच्या या यात्रेला दक्षिण भारतात मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. महाराष्ट्रातही त्याचे दर्शन झाले. नागरी संघटना या यात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत.याचा साधासरळ अर्थ असा की मोदी राजवट ज्या त-हेने सुरु आहे त्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे. अल्पसंख्यांविरुद्ध जे हिंसेचे राजकारण केले जात आहे ते नागरी समाजाला मान्य नाही.

लेखक सिंधुदुर्गातील सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.